अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द: उच्च न्यायालयाचा निर्णय

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकांसोबतच विदर्भातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असली तरी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ती रद्द ठरवली आहे. अकोला येथील अनिल तुपे यांनी दाखल केलेली याचिका मंजूर करीत हा निर्णय देण्यात आला. Akola West assembly
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांचे 3 नोव्हेंबर 2023 रोजी निधन झाले. तेव्हापासून या विधानसभा मतदारसंघाचे आमदारपद रिक्त आहे. या ठिकाणी पोटनिवडणूक घेणे अपेक्षित असल्याने लोकसभा निवडणुकीसोबत या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली. मात्र, विधानसभा निवडणुकांना एक वर्षापेक्षा कमी काळ राहिलेला असताना पोटनिवडणूक घेणे संयुक्तिक नाही. नवनिर्वाचित आमदार म्हणून वर्षभराचा कालावधी मिळत असल्यास पोटनिवडणूक घेतली जाते, असा नियम आहे. Akola West assembly
या संदर्भात उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निकालाच देखील संदर्भ देण्यात आला.अखेर पुढील सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका असल्याने ही निवडणूक रद्द करण्यात यावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली. न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि न्यायमूर्ती एम एस जवलकर यांनी दोन्ही पक्षाची बाजू एकून ही निवडणूक रद्द केली. याचिकाकर्त्याकडून ऍड अक्षय नाईक, जुगविजयय गांधी, राज्य सरकारकडून मुख्य सरकारी वकील देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली.
दरम्यान, या निर्णयासोबतच महाविकास आघाडी मध्ये या मतदारसंघात तिकीट वाटपावरून सुरू असलेला तिढा देखील संपण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसकडून साजिद खान पठाण तर शिवसेनेकडून नगरसेवक राजेश मिश्रा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. भाजपने उमेदवारी जाहीर केली नसली तरी दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांचे पुत्र कृष्ण शर्मा, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, अशोक ओळंबे, गिरीश जोशी यांच्या नावाची चर्चा होती.
हेही वाचा
नागपूर: मुलगा, बहिणीसह ५ जणांची हत्या; क्रूरकर्मा विवेक पालटकरची फाशी कायम
नागपूर : गडकरी-पारवे भरणार आज अर्ज, महायुतीच्या नेत्यांची हजेरी
नागपूरसाठी ११, रामटेकसाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल
Latest Marathi News अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द: उच्च न्यायालयाचा निर्णय Brought to You By : Bharat Live News Media.
