लातूर: औराद परिसरात भूगर्भातील गूढ आवाजाने नागरिक भयभीत
औराद शहाजानी: औराद शहाजानी व परिसराच्या गावातील नागरिक आज (दि.२७) सकाळी भूगर्भातील आवाज व धक्क्याने भयभीत झाले. आज सकाळी ११. ५० वाजता औराद व परिसरातील तगरखेडा, शेळगी, सावरी, हलगरा, ताडमुगळी आदी गावात मोठा आवाज झाला. त्यानंतर जमीन हादरल्याचे जाणवले. खिडक्यांच्या काचांचा आवाज आला. त्यामुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माहिती घेतली असता हा भूकंप नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा
लातूर : भरधाव कार हॉटेलात घुसली; भीषण अपघातात २ जण ठार; ३ जखमी
लातूर: वाघनाळवाडीत सप्ताहाच्या पंगतीला भगरीचा प्रसाद: २०० भाविकांना विषबाधा
लातूर : देवणीत पुन्हा एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Latest Marathi News लातूर: औराद परिसरात भूगर्भातील गूढ आवाजाने नागरिक भयभीत Brought to You By : Bharat Live News Media.