अदिती राव हैदरीने अभिनेता सिद्धार्थशी गुपचूप केलं लग्न?

पुढारी ऑनलाईन डेस्क : रंग दे बसंती अभिनेता सिद्धार्थ आणि आदिती राव हैदरीने गुपचूप लग्न केल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर दोघाचा फोटो व्हायरल होत असून असे म्हटले जात आहे की, अभिनेता सिद्धार्थने आज सकाळी वानपर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरम मंदिरात (Aditi Rao Hydari-Siddharth Marriage) अदितीशी लग्न केले. यामध्ये फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित केले … The post अदिती राव हैदरीने अभिनेता सिद्धार्थशी गुपचूप केलं लग्न? appeared first on पुढारी.

अदिती राव हैदरीने अभिनेता सिद्धार्थशी गुपचूप केलं लग्न?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रंग दे बसंती अभिनेता सिद्धार्थ आणि आदिती राव हैदरीने गुपचूप लग्न केल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर दोघाचा फोटो व्हायरल होत असून असे म्हटले जात आहे की, अभिनेता सिद्धार्थने आज सकाळी वानपर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरम मंदिरात (Aditi Rao Hydari-Siddharth Marriage) अदितीशी लग्न केले. यामध्ये फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित केले होते. हे मंदिर तेलंगणामध्ये असल्याचे म्हटले जात आहे. जोडप्याने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. (Aditi Rao Hydari-Siddharth Marriage)

पारंपरिक रीतिरिवाजांसह लग्न
असे म्हटले जात आहे की, या कपलने त्यांच्या पारंपरिक रितीरिवाजानुसार लग्न केले. या सोहळ्यासाठी तामिळनाडूतील पुजारी बोलावण्यात आले होते. आदिती आणि सिद्धार्थ यांनी वाणपर्थीच्या मंदिराला भेट दिली. अदिती राजघराण्यातील आहे. तर सिद्धार्थ अभिनेता असून त्यांनी आपल्या लग्नाबाबत कुठेही माहिती दिली नाही. किंवा मीडिया कव्हरेज केले नाही. या कपलकडून लग्नाच्या वृत्ताला दुजोरा अद्याप मिळालेला नाही.
 
Latest Marathi News अदिती राव हैदरीने अभिनेता सिद्धार्थशी गुपचूप केलं लग्न? Brought to You By : Bharat Live News Media.