Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची बळकावू शकतात. काही वर्षांपूर्वी बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी असेच केले होते. सुनीता केजरीवाल दिल्लीच्या ‘राबडीदेवी’ होतील. असा दावा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, बिहारमध्ये चारा घोटाळा प्रकरणी तत्कालिन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना अटक झाली होती. तेव्हा त्यांच्या पत्नी राबडी देवीही सुरुवातीला केवळ घोषणा करत होत्या. मात्र नंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्चीच बळकावली.
अरविंद केजरीवाल नीतिमत्तेबद्दल बोलत असत. ते काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषणाला बसले होते. आज ते स्वत: भ्रष्टाचाराच्या दलदलीत आहेत. दिल्ली दारु धोरण घोटाळा प्रकरणी ‘आप’चे खासदार, आरोग्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि त्यांचे आमदार सगळे तुरुंगात आहेत, असेही ठाकूर म्हणाले.
अनैतिक, अराजक, कट्टर बेईमान शराब घोटाले के किंगपिन अरविंद केजरीवाल जेल में हैं, मगर क्या…
सोनिया गांधी की गिरफ़्तारी की माँग करने करने वाले केजरीवाल पर कांग्रेस ने अब अपना ज़मीर बेच दिया है?
कांग्रेस की ऐसी क्या मजबूरी है कि केजरीवाल के भ्रष्टाचार के साथ खड़ा होना ज़रूरी है? pic.twitter.com/9m0wYyz3sQ
— Anurag Thakur (मोदी का परिवार) (@ianuragthakur) March 27, 2024
Latest Marathi News सुनीता केजरीवाल दिल्लीच्या ‘राबडीदेवी’ होतील : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुरांचा दावा Brought to You By : Bharat Live News Media.