KICK फेम तमिळ सुपरस्‍टार लक्ष्‍मी नारायणन शेषु यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : तमिळ चित्रपट इंडस्‍ट्रीतील प्रसिद्ध कॉमेडियन-अभिनेते लक्ष्‍मी नारायणन शेषु यांचे वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. मंगळवार, २७ मार्च रोजी चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Lakshmi Narayanan Seshu) त्यांच्या जाण्याने साऊथ इंडियन चित्रपट इंडस्ट्रीत दु:खाची लहर आहे. सोशल मीडियावर फॅन्स त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. शेषु यांना १५ मार्च रोजी … The post KICK फेम तमिळ सुपरस्‍टार लक्ष्‍मी नारायणन शेषु यांचे निधन appeared first on पुढारी.

KICK फेम तमिळ सुपरस्‍टार लक्ष्‍मी नारायणन शेषु यांचे निधन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तमिळ चित्रपट इंडस्‍ट्रीतील प्रसिद्ध कॉमेडियन-अभिनेते लक्ष्‍मी नारायणन शेषु यांचे वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. मंगळवार, २७ मार्च रोजी चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Lakshmi Narayanan Seshu) त्यांच्या जाण्याने साऊथ इंडियन चित्रपट इंडस्ट्रीत दु:खाची लहर आहे. सोशल मीडियावर फॅन्स त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. शेषु यांना १५ मार्च रोजी हार्टअॅटॅक आला होता. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Lakshmi Narayanan Seshu)
लक्ष्‍मी नारायणन शेषु यांना लोलू सभा शेषु म्हणूनही ओळखायचे. त्यांना हे नाव टीव्ही शो ‘लोलू सभा’ यातून मिळालं होतं. शेषु यांनी धनुष सोबत २००२ मध्ये ‘थुल्‍लूवाधो इलामई’ मधून मोठ्या पडद्यावर डेब्‍यू केला होता. गेल्या २२ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी २१ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या.
यामध्ये २०२३ मध्ये सुपरहिट रिलीज तमिल रोमँटिक-कॉमेडी ‘किक’ देखील समाविष्ट आहे. चित्रफटामध्ये संथानम मुख्य भूमिकेत होते.
Latest Marathi News KICK फेम तमिळ सुपरस्‍टार लक्ष्‍मी नारायणन शेषु यांचे निधन Brought to You By : Bharat Live News Media.