विठुनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी
पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :
तुझे दर्शन झाले आता!
तू सकल जणांचा दाता!!
घे कुशीत गा माऊली!
तुझ्या पायरी ठेवतो माथा!!
असे हृदय स्वर म्हणत चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा करत लाखो भाविकांच्या हरिनामाचा जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमली आहे. कार्तिकी एकादशीच्या मुख्य सोहळ्याला सुमारे 5 लाख भाविकांनी उपस्थिती दर्शवल्याने पंढरीनगरी वैष्णवमय झाली आहे. मठ, मंदिर, संस्थाने, तंबू, राहुट्यांमधून भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग आहेत. ‘माऊली माऊली…’च्या जयजयकाराने अवघी पंढरी भक्तिमय झाली.
कार्तिकी यात्रा एकादशीच्या मुख्य सोहळ्याला मजल दरमजल करत लहान-मोठ्या दिंड्यांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. भाविकांमुळे मठ, मंदिरे, धार्मिक शाळा, संस्थाने गजबजून गेली आहेत. 65 एकर येथील भक्तिसागर, रेल्वे मैदान, उपनगरीय भागातही भाविक राहुट्या, तंबू उभारून वास्तव्य करत आहेत. भजन, कीर्तन, प्रवचनात भाविक दंग झाले आहेत. दर्शन रांगेत एकादशी दिवशी सुमारे दीड लाख भाविक प्रतीक्षा करत होते. दर्शन रांग पत्राशेडच्या बाहेर पडून गोपाळपूरमध्ये दाखल झाली होती. दर्शन रांगेतील भाविकांना दर्शन मिळण्यास सुमारे 7 ते 8 तासांचा अवधी लागत असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.
आषाढीच्या यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी पहाटेपासूनच चंद्रभागा नदीत स्नानासाठी गर्दी केली होती. स्नानानंतर दर्शन घेऊन भाविक प्रसाद, कुंकूबुक्का, अगरबत्ती खरेदीकडे वळत असल्याचे चित्र दिसून येते. यामुळे मंदिर परिसरातील दुकाने ग्राहकांनी गजबजून गेली. प्रासादिक साहिंत्याची विक्री जास्त होताना दिसून येत आहे.
पोलिस सुरक्षेमुळे यंदाच्या कार्तिकी यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा पोलीस विभागाकडून माऊली स्कॉड, अपघातमुक्तवारी ही संकल्पना राबवण्यात आली आहे. चोर्या रोखण्यासाठी दामिनी पथक तैनात करण्यात आले. पाच ठिकाणी आपत्तीकालीन विभाग कार्यरत ठेवला आहे. सीसीटिव्ही व्दारे लक्ष ठेवले जात आहे. भाविकांना काही अडचण आल्यास त्वरित संपर्क करता येत आहे. आरोग्य कर्मचारी, आरोग्य पथके तैनात असल्याने वेळीच भाविकांना औषधोपचार करण्यात येत आहेत.यंदा प्रथमच कार्तिकी यात्रेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 65 एकर येथे येथे महाआरोग्य शिबीर राबवण्यात आले आहे. याचा लाखो भाविकांनी लाभ घेत आहेत. कार्तिकी यात्रेकरीता यंदा विशेष रेल्वे गाड्या व एसटी एसटी बसगाड्या पंढरपूरपर्यंत सोडण्यात आल्या आहेत. एसटी बसेसने महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलत योजना असल्यामूळे महिला भाविकांची संख्या जास्त दिसून येत आहे. लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांमुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
The post विठुनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी appeared first on पुढारी.
पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : तुझे दर्शन झाले आता! तू सकल जणांचा दाता!! घे कुशीत गा माऊली! तुझ्या पायरी ठेवतो माथा!! असे हृदय स्वर म्हणत चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा करत लाखो भाविकांच्या हरिनामाचा जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमली आहे. कार्तिकी एकादशीच्या मुख्य सोहळ्याला सुमारे 5 लाख भाविकांनी उपस्थिती दर्शवल्याने पंढरीनगरी वैष्णवमय झाली आहे. मठ, मंदिर, संस्थाने, तंबू, …
The post विठुनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी appeared first on पुढारी.