दुर्दैवी : वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; सांडवे फाटा येथील घटना
वाळकी : Bharat Live News Media वृत्तसेवा : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील युवकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. नगर- जामखेड रस्त्यावर चिचोंडी पाटील जवळील सांडवे फाट्यावर सोमवारी (दि.25) पहाटे 1.10 च्या सुमारास ही घटना घडली. प्रतीक प्रशांत खांदवे (वय 22, रा. सांडवे, ता.नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. प्रतीक हा जामखेड रस्त्याने गावाकडे जात असताना सांडवे फाटा येथे भरधाव वाहनाने त्याच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला.
त्याला त्याचे मामा दिनेश गांगर्डे यांनी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर अपघाताचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा
पंचायत समितीत साखळी पद्धतीने गैरव्यवहार! अधिकार्यांची चौकशी होणार का?
Success Story ! सासूचे कष्ट व सुनेची जिद्द; शीतल शिंदे ग्राम महसूल अधिकारीपदी
वजनाबाबत तक्रारी आल्यास कारवाई : पणन संचालक विकास रसाळ
Latest Marathi News दुर्दैवी : वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; सांडवे फाटा येथील घटना Brought to You By : Bharat Live News Media.