पुढरी ऑनलाईन डेस्क : भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल ‘इस्लामोफोबिक’ म्हणत गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (एलएसई) मधील भारतीय विद्यार्थी सत्यम सुराणा याने केला आहे. विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीतील प्रचारावेळी ‘फॅसिस्ट’ म्हणूनही संबाेधित करण्यात आल्याचे सुराणा याने ‘एएनआय’शी बाेलताना सांगितले. मागील वर्षी भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तानी समर्थकांनी केलेल्या हल्ल्या दरम्यान जमिनीवर पडलेला तिरंगा उचल्याने सत्यम सुराणा प्रसिद्धीच्या झोतात आला होता. (Indian student alleges hate campaign against him during college elections in London )
‘विरोधकांनी मला भाजपशी जोडले’
सत्यमने आरोप केला आहेकी, विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू होण्याच्या काही तास आधी त्याच्याविरोधात मोहीम सुरू करण्यात आली. विरोधकांनी त्याला भाजपशी जोडले. तसेच बहिष्कार टाकण्यासाठी त्याला ‘फॅसिस्ट’ म्हणू लागले. (Indian student alleges hate campaign against him during college elections in London )
“They can’t digest India’s rise…”: Indian student alleges hate campaign against him during college elections in London
Read @ANI Story | https://t.co/1kAj64UevC#IndianStudent #London #HateCampaign pic.twitter.com/39R6CinBsi
— ANI Digital (@ani_digital) March 26, 2024
‘सत्यम व्यतिरिक्त कोणीही…’
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या निवडणुका फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला जाहीर झाल्या. सुराणा याने सरचिटणीस पदासाठी निवडणूक अर्ज भरला. 14 ते 15 मार्चपर्यंत माझे पोस्टर्स फाडले गेले. याबाबत आम्ही अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. १६ मार्च आम्ही आमचे पोस्टर बदलले. तेव्हा काही पोस्टर्स खराब झाल्याचे आमच्या लक्षात आले. माझ्या चेहऱ्यावर क्रॉसच्या खुणा होत्या. त्यावर लिहिले होते ‘सत्यम व्यतिरिक्त कोणीही.’
सत्यमने म्हटलं आहे की, “१७ मार्च राेजी दुपारी सर्व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या साेशल मीडिया ग्रूपमध्ये मेसेज आले होते की, ‘हा सत्यम सुराणा भाजप समर्थक आहे, तो फॅसिस्ट व्यक्ती आहे, इस्लामोफोब आहे, ट्रान्सफोब आहे.’ हे संदेश भारत सरकारसाठी अत्यंत वादग्रस्त होते.”
भाजप सरकारचे कौतुक केल्याबद्दल निशाणा साधला
सत्यमने आरोप केला की, मूलतत्त्ववादी घटकांनी X हँडेलवर त्याच्या पोस्टचे स्क्रीनशॉट देखील घेतले, जिथे त्यांनी फक्त भाजप सरकारची प्रशंसा केली होती; परंतु त्यांच्या पोस्टचा वापर त्यांना ‘फॅसिस्ट’ म्हणून संबोधण्याच्या दुर्भावनापूर्ण अजेंड्यासह केला गेला.
विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसाठी आपल्या जाहीरनाम्याबद्दल बोलताना सत्यम म्हणाला की, मी कॅम्पसमधील वास्तविक समस्या मांडण्याबद्दल बोलत हाेते. मी माझ्या संपूर्ण टीमसोबत संपूर्ण कॅम्पसमध्ये गेलो होतो. आम्ही सर्व विभागांमध्ये जाऊन आमची धोरणे समजावून सांगत होतो. माझ्याकडे खूप चांगले लिहिलेला आणि चांगला तयार केलेला जाहीरनामा होता. माझा जाहीरनामा राजकीय नव्हता. त्यामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला कसे सुधारणे आवश्यक आहे? हे सांगितले हाेते. आम्हाला पाठिंबा मिळत होता. लोक मला मत देतील असे सांगत होते.
माझ्यावर टीका करणारे लोक PM नरेंद्र मोदींचे यश पचवू शकले नाहीत
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे सत्यमचे छायाचित्र (फडणवीस यांनी भारत दौऱ्यावर असताना त्यांना निमंत्रित केले तेव्हा काढलेले) त्यांचा भाजपशी संबंध जोडण्यासाठी वापरण्यात आल्याचेही सत्यम याने म्हटले आहे. माझ्यावर टीका करणारे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यश पचवू शकले नाहीत, म्हणून अशा खोट्या आणि दुर्भावनापूर्ण प्रचाराचा अवलंब करत असल्याचा दावाही सत्यमने केला आहे.
प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात पुरेसा पाठिंबा मिळूनही तो जिंकू शकला नाही. निवडणुका संपल्यानंतरही या मोहिमेचा त्यांच्या आणि त्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला. मात्र, आपल्या पाठीशी उभ्या असलेल्यांकडून मिळालेल्या समर्थनामूळे या सर्व बाबींचा सामना केल्याचेही त्याने म्हटलं आहे.
हेही वाचा :
London News : लंडनमध्ये चर्चजवळ गोळीबार, मुलीसह पाचजण जखमी
London : वुहानच्या प्रयोगशाळेतूनच कोरोना विषाणुची उत्पत्ती; शास्त्रज्ञांचा दावा
The post भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल ‘इस्लामोफोबिक’ म्हणत लंडनमध्ये भारतीय विद्यार्थ्याशी गैरवर्तन appeared first on Bharat Live News Media.