कोल्हापूर: शिये उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर
शिरोली एमआयडीसी; Bharat Live News Media वृत्तसेवा : शिये (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रभाकर काशीद हे मनमानी कारभार करतात. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, तसेच अधिकाराचा दुरुपयोग करतात या कारणांमुळे दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने १४ तर काशीद याच्या बाजूने स्वतःचे एक मत असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. सभेचे अध्यक्षस्थानी तहसीलदार स्वप्नील रावडे होते.
करवीर तालुक्यातील शिये ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रभाकर काशीद यांच्याविरोधात सरपंच शितल मगदूम आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. उपसरपंच काशीद हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करतात, तसेच अधिकाराचा दुरुपयोग करतात, त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही म्हणून अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आला होता. बुधवारी तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला. या वेळी ग्रामविकास अधिकारी तानाजी पाटील उपस्थित होते.
शिये ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी गटाचे दहा सदस्य तर विरोधी गटाचे सात ग्रामपंचायत सदस्य होते. यामधील एक ग्रामपंचायत सदस्य अपात्र झाला आहे. यामुळे शिये ग्रामपंचायतीमधील धुसफूस उघडकीस आली आहे.
हेही वाचा
कोल्हापूर : हेरिटेज समिती गुल, अनावश्यक गोष्टींना निधी फुल्ल
कोल्हापूर – केर्लेपर्यंतचा महामार्ग मृत्यूचा सापळा
कोल्हापूरचा पारा 38.2 अंशांवर किमान तापमानातही वाढ
Latest Marathi News कोल्हापूर: शिये उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर Brought to You By : Bharat Live News Media.