शंभरची नोट, दहा रुपयांची खरेदी

दोघे आलिशान कारमधून खाली उतरले. त्यांनी उंबरठाण गावातील आठवडे बाजारातून भाजीपाला खरेदी करण्यास सुरुवात केली. १० रुपयांची कोंथिबीर खरेदी केल्यानंतर त्यांनी १०० रुपयांची नोट दिली. त्यानंतर पुढे लसून, इतर भाजीपालाही घेतला. मात्र प्रत्येकाकडे दोघांनी १०० रुपयांचीच नोट दिली. त्यामुळे एका विक्रेत्या महिलेस संशय आला. महिलेने इतर विक्रेत्यांना याची माहिती दिली. सर्वांनी दोघांकडे चौकशी केल्यानंतर त्यापैकी … The post शंभरची नोट, दहा रुपयांची खरेदी appeared first on पुढारी.

शंभरची नोट, दहा रुपयांची खरेदी

गौरव अहिरे, नाशिक

दोघे आलिशान कारमधून खाली उतरले. त्यांनी उंबरठाण गावातील आठवडे बाजारातून भाजीपाला खरेदी करण्यास सुरुवात केली. १० रुपयांची कोंथिबीर खरेदी केल्यानंतर त्यांनी १०० रुपयांची नोट दिली. त्यानंतर पुढे लसून, इतर भाजीपालाही घेतला. मात्र प्रत्येकाकडे दोघांनी १०० रुपयांचीच नोट दिली. त्यामुळे एका विक्रेत्या महिलेस संशय आला. महिलेने इतर विक्रेत्यांना याची माहिती दिली. सर्वांनी दोघांकडे चौकशी केल्यानंतर त्यापैकी एक गांगरला. त्यामुळे विक्रेत्यांना संशय आला व त्यांनी दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर तीन वर्षांतच न्यायालयाने या दोघांसह एकूण चौघांना सात वर्षांची सक्तमजूरी व दंड अशी शिक्षा सुनावली.
सखुबाई या नेहमीप्रमाणे सुरगाणा तालुक्यातील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी आल्या. अनेक वर्षांपासून त्या भाजीपाला विक्री करून स्वत:सह कुंटूबियांचा उदरनिर्वाह करीत होत्या. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी सामाजिक अनुभवांनी त्या समृद्ध होत्या. नेहमीप्रमाणे आठवडे बाजारात त्यांनी स्टॉल मांडला. दुपारी बाराच्या सुमारास बाजारातील गर्दी ओसरत असतानाच त्यांच्यासमोर दोन व्यक्ती आल्या. त्यांनी १० रुपयांचा लसून खरेदी करीत १०० रुपयांची नोट दिली. लक्ष्मीबाईंनी लसून व ९० रुपये परत केले. मात्र खुप दिवसांनी बाजारात बाहेरगावची व्यक्ती खरेदीसाठी आल्याने त्यांच्यात कुतूहुल होते. त्यांनी दोघांकडे निरखून पाहण्यास सुरुवात केली. त्यावेळी दोघांनी बाजारातून कांदा, भाजीपाला खरेदी केला. मात्र प्रत्येकाकडे त्यांनी १०० रुपयांचीच नोट दिली. त्यामुळे सखुबाईंनी त्यांच्याकडील १०० रुपयांची नोट कुतुहलापोटी निरखून पाहिली. त्यांना ती वेगळी वाटल्याने त्यांनी इतर विक्रेत्यांकडे नोट दाखवत त्यांच्याकडीलही नोट तपासली. इतरांनाही नोटांमध्ये खोट वाटल्याने त्यांनी एकत्रित होत दोघांना घेरले. दोघांकडे चौकशी करीत असतानाच विक्रेत्यांना १०० रुपयांची नोट बनावट असल्याचे समजले. त्यामुळे दोघांकडे याचा जाब विचारला असता दोघांपैकी एक गांगरला. त्यामुळे विक्रेत्यांचा संशय आणखीन बळावला. त्यांनी तातडीने सुरगाणा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत चौकशी सुरु केली. त्यावेळी दोघांकडे बनावट नोटा आढळून आल्या. तसेच त्यांनी बाजारपेठेतून खरेदी करताना वापरलेल्या नोटाही बनावट असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तेथील राष्ट्रीयकृत बँकेत नोटांची तपासणी केली असता या नोटा बनावट असल्याचा प्राथमिक अहवाल बँक अधिकाऱ्यांनी दिला. दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी सखोल तपास केला. त्यावेळी दोघांनी या नोटा विंचुर येथून भेटल्याचे सांगितले. पोलिसांनी विंचुर येथे कारवाई करीत एकास पकडले. त्याची स्वत:ची प्रिटींग प्रेस असल्याचे उघड झाले. या प्रिटींग प्रेसमधून पोलिसांना १०० रुपयांच्या एका बाजूने छापलेल्या नोटा सापडल्या. याप्रकरणी एकूण सात जणांची धरपकड करीत त्यांच्याकडून १०० रुपयांच्या १९४ व ५०० रुपयांची एक अशा बनावट नोटा जप्त केल्या होत्या. बनावट नोटा छापल्यानंतर त्या नोटांचा वापर आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी करून नाेटा चलनात आणण्याचा डाव संशयितांनी रचला होता. मात्र सखुबाईंच्या चाणाक्ष नजर व अनुभवामुळे त्यांचा हा डाव उघड झाला होता. पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सुनावणी दरम्यान, सखुबाईसह इतर विक्रेत्यांनी साक्ष फिरवली. मात्र सरकारी पंच, तपासी अंमलदार यांनी त्यांची साक्ष कायम ठेवली. तसेच राष्ट्रीयकृत बँकेने दिलेला प्राथमिक अहवाल आणि नाशिकच्या करन्सी नोट प्रेसने दिलेल्या तज्ञ अहवालाच्या आधारे न्यायालयाने सातपैकी चौघांना बनावट नोटा छापून त्या चलनात आणल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा सुनावली.
हेही वाचा :

पाण्याअभावी पिके जळू लागली; पोटचार्‍यांना पाणी सोडण्याची मागणी
स्टार्टअपमधील अडथळे दूर होतील?
तडका : नवे मतदार नवा मोह

Latest Marathi News शंभरची नोट, दहा रुपयांची खरेदी Brought to You By : Bharat Live News Media.