दै. ‘पुढारी’- टोमॅटो एफएम आयोजित शॉपिंग उत्सव 2023 : दुसरा लकी ड्रॉ उत्साहात

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सणासुदीच्या काळात खरेदीसोबत लाखो रुपयांची बक्षिसे जिंकून देण्याची संधी देणार्‍या दै. ‘पुढारी’ व टोमॅटो एफएम आयोजित ‘शॉपिंग उत्सव 2023’चा दुसरा लकी ड्रॉ उत्साहात पार पडला. या ड्रॉमध्ये अर्धा तोळा सोन्याच्या पहिल्या बक्षिसाचे मानकरी आर. के. नगर येथील जयसिंग तातोबा पाटील व नागाळा पार्क येथील सूर्यकांत बी. पाटील ठरले. बसंत-बहार रस्त्यावरील एस. … The post दै. ‘पुढारी’- टोमॅटो एफएम आयोजित शॉपिंग उत्सव 2023 : दुसरा लकी ड्रॉ उत्साहात appeared first on पुढारी.
#image_title

दै. ‘पुढारी’- टोमॅटो एफएम आयोजित शॉपिंग उत्सव 2023 : दुसरा लकी ड्रॉ उत्साहात

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सणासुदीच्या काळात खरेदीसोबत लाखो रुपयांची बक्षिसे जिंकून देण्याची संधी देणार्‍या दै. ‘पुढारी’ व टोमॅटो एफएम आयोजित ‘शॉपिंग उत्सव 2023’चा दुसरा लकी ड्रॉ उत्साहात पार पडला. या ड्रॉमध्ये अर्धा तोळा सोन्याच्या पहिल्या बक्षिसाचे मानकरी आर. के. नगर येथील जयसिंग तातोबा पाटील व नागाळा पार्क येथील सूर्यकांत बी. पाटील ठरले.
बसंत-बहार रस्त्यावरील एस. एस. मोबाईल्स प्रा. लि. मध्ये गुरुवारी (दि. 23) ड्रॉ काढण्यात आला. सोन्याचे मानकरी ठरलेले सूर्यकांत पाटील यांनी एस. एस. मोबाईल्समध्ये आणि जयसिंग पाटील यांनी मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ या दुकानांतून खरेदी केली आहे.
यावेळी एस. एस. कम्युनिकेशनचे अतुल भांड, मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफचे रूद्र चिपडे, राजाकाका इलेक्ट्रॉनिक्स मॉलचे संस्कार केशवानी, विश्वकर्मा डेव्हलपर्सचे शंकर गावडे, दत्तात्रेय तुकाराम कारेकर सराफचे रोहित कारेकर, महेंद्र ज्वेलर्सचे कुशल ओसवाल आदींच्या हस्ते हा लकी ड्रॉ काढण्यात आला.
यावेळी दै. ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, जाहिरात व्यवस्थापक (शहर) अतुल एकशिंगे, सहायक जाहिरात व्यवस्थापक रिया भांदिगरे यांच्यासह जाहिरात प्रतिनिधी व ग्राहक उपस्थित होते.
बक्षीस विजेते व कंसात कुपन क्र. :
प्रथम क्रमांक (अर्धा तोळे सोने) : जयसिंग पाटील (48621) , सूर्यकांत पाटील (19916).
द्वितीय क्रमांक (1 ग्रॅम सोने) : समर्थ पठाडे (कुपन क्र. 19830), मंदार मुळे (12414), राज कोटकर (36508) युवराज गवळी (36554), सानिका पाटील (19567).
तृतीय क्रमांक (स्मार्ट फोन) : अरविंद गवळी (33592), गुलाब मुल्लाणी (24588), सर्जेराव कारंडे (24239), सुरेखा सिंग (14011), सतीश पाटील (38633).
15 ऑक्टोबरपासून सुरू झालेला ‘पुढारी शॉपिंग उत्सव 2023’ हा 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या लकी ड्रॉ योजनेत सहभागी दुकानांतून खरेदी करणार्‍या ग्राहकांना कुपन दिले होते. या योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. या लकी ड्रॉमध्ये सोने, स्मार्ट फोन, ब्लेंडर, हेडफोन व सरप्राईज गिफ्ट या बक्षिसांठी विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.
हे अर्धा तोळेही नातवालाच देणार
माझ्या मुलीला नुकताच मुलगा झाला. त्याच्यासाठी चेन खरेदी करण्यासाठी भाऊसिंगजी रोडवरील मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ यांच्या दुकानात गेलो होतो. त्यावेळी आम्हाला एक तोळ्याची चेन घ्यायची होती; पण पैसे कमी होते, म्हणून अर्धा तोळ्याचीच घेतली. आम्हाला आनंदाची बातमी मिळाली. ‘पुढारी शॉपिंग उत्सव’ने आमची इच्छा पूर्ण केली. हे अर्धा तोळे नातवालाच देणार आहे, असे जयसिंग पाटील यांनी सांगितले.
दिवाळीचा आनंद द्विगुणीत
मी माझ्या नातवाच्या आग्रहावरून एस. एस. मोबाईल्समध्ये घड्याळ आणि स्क्रिन गार्ड खरेदी केला. सहज म्हणून कुपन भरून दिले होते. पुढारी व टोमॅटो एफएम शॉपिंग उत्सवाने आमचा दिवाळीचा आनंद द्विगुणीतच नाही, तर शतगुणीत केला. दै. ‘पुढारी’ने या दिवाळीत आम्हाला अनमोल भेट दिली. आम्ही खूप आधीपासून ‘पुढारी’चे नियमित वाचक आहोत. आता ‘पुढारी न्यूज’ चॅनेलही नियमित पाहतो. अल्पावधीतच या चॅनेलने चांगला पिकअप घेतला आहे, असे सूर्यकांत पाटील यांनी सांगितले.
The post दै. ‘पुढारी’- टोमॅटो एफएम आयोजित शॉपिंग उत्सव 2023 : दुसरा लकी ड्रॉ उत्साहात appeared first on पुढारी.

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सणासुदीच्या काळात खरेदीसोबत लाखो रुपयांची बक्षिसे जिंकून देण्याची संधी देणार्‍या दै. ‘पुढारी’ व टोमॅटो एफएम आयोजित ‘शॉपिंग उत्सव 2023’चा दुसरा लकी ड्रॉ उत्साहात पार पडला. या ड्रॉमध्ये अर्धा तोळा सोन्याच्या पहिल्या बक्षिसाचे मानकरी आर. के. नगर येथील जयसिंग तातोबा पाटील व नागाळा पार्क येथील सूर्यकांत बी. पाटील ठरले. बसंत-बहार रस्त्यावरील एस. …

The post दै. ‘पुढारी’- टोमॅटो एफएम आयोजित शॉपिंग उत्सव 2023 : दुसरा लकी ड्रॉ उत्साहात appeared first on पुढारी.

Go to Source