तोंडात फुगा फुटून श्वासनलिकेत अडकल्याने बालकाचा मृत्यू
इचलकरंजी : फुगा फुगवत असताना तोंडात फुटून फुग्याचा तुकडा श्वासनलिकेत अडकल्यामुळे साडेतीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गौरांश अमित लगारे (रा. अण्णा रामगोंडा शाळेजवळ) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. गौरांश मंगळवारी सकाळी मित्रांसह खेळत होता. खेळताना गौरांश फुगा फुगवत असताना तो फुटला. परंतु, फुटलेला
फुगा घेऊन तो पुन्हा फुगवताना फुटून थेट गौरांशच्या श्वासनलिकेमध्ये अडकला. त्यामुळे गौरांश जागीच बेशुद्ध पडला. ही घटना लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयामध्ये नेले; पण प्रकृती अत्यवस्थतेमुळे पुढील उपचारांसाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी स्पष्ट केले. नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती. गौरांशच्या मागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
Latest Marathi News तोंडात फुगा फुटून श्वासनलिकेत अडकल्याने बालकाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.