मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर अंतरवालासराटीत
वडीगोद्री, Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीसाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे आज अंतरवाली सराटीत मध्यरात्री भेटण्याकरीता गेलेले होते. सुमारे अर्ध्या तासापासून या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे. चर्चेचा तपशील कळालेला नाही. मात्र लोकसभा निवडणुकीच्या बाबत चर्चा सुरू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांची उद्या सकाळी महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद असल्याने या भेटीकडे राजकीय दृष्टीने सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
वेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, सध्या निवडणुकीचे वारे आहे.मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाली असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. ते मनोज जरांगे यांच्या भेटी नंतर पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
अंतरवाली सराटी येथे येत्या 30 तारखेला समाजाची महत्वाची बैठक आहे. या दिवशी समाजा सोबत चर्चा करूण वंचित सोबतचा निर्णय घेण्यात येईल. माझा मार्ग राजकारण नाही. त्यामुळे समाज जो निर्णय घेईल तो 30 तारखेला जाहीर करू असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
Latest Marathi News मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर अंतरवालासराटीत Brought to You By : Bharat Live News Media.