कोल्हापूर : कत्तलीसाठी नेत असलेल्या बैलांची कुरुंदवाड पोलिसांकडून सुटका; टेम्पो चालक ताब्यात

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : टाकळीवाडी ता. शिरोळ येथे बैलांना कत्तलीसाठी नेणाऱ्या टेम्पोवर पोलिसांनी कारवाई केल्याची घटना समोर आली आहे. नागरिकांनी फोन करून दिलेल्या माहितीनंतर कुरुंदवाड पोलिसांनी ही कारवाई केली. अधिक माहितीनुसार, टाकळीवाडी येथे ऊस तोडीसाठी आलेले मजूर ऊसतोड संपल्याने पुन्हा आपल्या गावी रवाना होत असताना त्यांनी तीन बैल विक्री केले. संशयित आरोपी भर्मा खोत हा … The post कोल्हापूर : कत्तलीसाठी नेत असलेल्या बैलांची कुरुंदवाड पोलिसांकडून सुटका; टेम्पो चालक ताब्यात appeared first on पुढारी.

कोल्हापूर : कत्तलीसाठी नेत असलेल्या बैलांची कुरुंदवाड पोलिसांकडून सुटका; टेम्पो चालक ताब्यात

कुरुंदवाड; Bharat Live News Media वृत्तसेवा : टाकळीवाडी ता. शिरोळ येथे बैलांना कत्तलीसाठी नेणाऱ्या टेम्पोवर पोलिसांनी कारवाई केल्याची घटना समोर आली आहे. नागरिकांनी फोन करून दिलेल्या माहितीनंतर कुरुंदवाड पोलिसांनी ही कारवाई केली.
अधिक माहितीनुसार, टाकळीवाडी येथे ऊस तोडीसाठी आलेले मजूर ऊसतोड संपल्याने पुन्हा आपल्या गावी रवाना होत असताना त्यांनी तीन बैल विक्री केले. संशयित आरोपी भर्मा खोत हा क्र. के.ए.22, डी.7062 या टेम्पोमध्ये कत्तलीसाठी तीन बैल भरून जात असल्याची माहिती पोलिसांना नागरिकांनी दिली.
कुरुंदवाड पोलिसांनी सदरचा टेम्पो ताब्यात घेऊन बैलांना पांजरपोळकडे रवाना करून टेम्पो चालक भरमा कडप्पा खोत (रा.खजगौडहट्टी, ता.चिकोडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. बैलांची पांजरपोळकडे रवानगी केल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी कमी केली. कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनी रविराज फडणीस यांच्या पथकाने ही कारवाई करुन संबंधितावर गुन्हा दाखल केला.
Latest Marathi News कोल्हापूर : कत्तलीसाठी नेत असलेल्या बैलांची कुरुंदवाड पोलिसांकडून सुटका; टेम्पो चालक ताब्यात Brought to You By : Bharat Live News Media.