नागपूरसाठी ११, रामटेकसाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : १९ एप्रिल रोजी होणाऱ्या नागपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज (दि.२६) ११उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले. आजपर्यंत एकूण १९ अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष), संतोष चव्हाण (अपक्ष), बबिता अवस्थी (अपक्ष), विनायक अवचट (अपक्ष), श्रीधर साळवे (भीम सेना), सचिन वाघाडे (अपक्ष), ॲड. पंकज शंभरकर (अपक्ष), विशेष फुटाणे (बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी) आणि आदर्श ठाकूर (अपक्ष), किवीनसुका सुर्यवंशी (देश जनहित पार्टी) यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. तर विकास ठाकरे (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूरसाठी आज ७५ अर्जांची तर आतापर्यंत एकूण ३४७ अर्जांची उचल करण्यात आली.
दरम्यान, रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज ६ अर्ज स्वीकारण्यात आले. रामटेकसाठी एकूण दाखल अर्जांची संख्या ७ झाली आहे. रामटेकसाठी गोवर्धन सोमदेवे (अपक्ष), ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष), उमेश खडसे (राष्ट्र समर्पण पार्टी), शंकर चहांदे (वंचित बहुजन आघाडी), संदीप गायकवाड (अपक्ष), आशिष सरोदे (भीमसेना) यांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण ७ अर्ज दाखल करण्यात आले रामटेकसाठी आज ४२ अर्जांची उचल करण्यात आली. आतापर्यंत रामटेकसाठी एकूण २०५ अर्जांची उचल करण्यात आली. नामनिर्देशनपत्रे २७ मार्चपर्यंत सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत सादर करता येतील. २८ मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
हेही वाचा :
Loksabha Election 2024 : काँग्रेसला विदर्भात पुन्हा धक्का; माजी आमदार नामदेव उसेंडी भाजपात
Lok Sabha Election 2024 : ..तर महाविकास आघाडीने हातकणंगले मतदारसंघात मला पाठिंबा द्यावा : राजू शेट्टी
Lok Sabha Election News: शिवाजी आढळराव-पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Latest Marathi News नागपूरसाठी ११, रामटेकसाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल Brought to You By : Bharat Live News Media.