CUET-UG – 2024: कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा अर्ज मुदतीत वाढ
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आज अंडरग्रेजुएट कोर्सेससाठी (CUET UG 2024) कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम मुदत वाढवली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी रविवार ३१ मार्चपर्यंत (रात्री ९:५०) वेळ देण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती युजीसी अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून दिली आहे.
इच्छुक उमेदवार अधिकृत CUET UG 2024 वेबसाइट https://exams.nta.ac.in/CUET-UG/ वर अर्ज करू शकतात, असेही युजीसीने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
The deadline for online submission of the application form for the CUET-UG – 2024 has been extended to 31 March 2024 (Up to 09:50 P.M.) based on the request received from candidates and other stakeholders. Please visit https://t.co/Wsw5TdvcZP for the latest updates. #cuet pic.twitter.com/TYIZpSZ7kT
— Mamidala Jagadesh Kumar (@mamidala90) March 26, 2024
CUET UG 2024: अर्ज कसा करावा
पायरी 1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या — exams.nta.ac.in/CUET-UG/
पायरी 2: मुख्यपृष्ठावरील नोंदणी लिंकवर जा.
पायरी 3: आवश्यक वैयक्तिक आणि शैक्षणिक पात्रता तपशीलांसह ऑनलाइन अर्ज भरा.
चरण 4: फोटो आणि स्वाक्षरीच्या स्कॅन केलेल्या प्रतिमा निर्दिष्ट केलेल्या फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
पायरी 5: ऑनलाइन पेमेंट मोडद्वारे शुल्क भरा.
पायरी 6: अर्ज सबमिट करा आणि डाउनलोड करा.
Latest Marathi News CUET-UG – 2024: कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा अर्ज मुदतीत वाढ Brought to You By : Bharat Live News Media.