Horoscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
चिराग दारूवाला चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही तुमची कामे योग्य प्रकारे पूर्ण करू शकाल. विरोधक माघार घेतील. समाजातही मान-सन्मान वाढेल. घराशी संबंधित कोणत्याही कामात खर्चावर नियंत्रण ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे.
वृषभ : स्थलांतरासंदर्भात योजना आखली जात असेल तर ती सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. जवळच्या मित्राचा सल्ला तुम्हाला उपयुक्त ठरेल. कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कामांपासून दूर राहा. कुटुंबातील ज्येष्ठांचा अनुभव आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यवसायाच्या कार्यपद्धतीतील बदलांशी संबंधित धोरणांचा गांभीर्याने विचार करा.
मिथुन : आज तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक आनंदही मिळेल. तुमच्या कामाप्रती समर्पणाची भावना तुमच्यासाठी काही नवीन मार्ग शोधेल. महत्त्वाच्या गोष्टी व्यवस्थित जपून ठेवा, असा सल्ला श्रीगणेश देतात. इतरांवर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवा. व्यवसायात नवीन करार मिळू शकतात. पती-पत्नीमधील भावनिक संबंध मधुर होतील. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी व्यायाम करा.
कर्क : श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहमान अनुकूल आहे; पण वेळेचा पुरेपूर वापर करणे हे तुमच्या कामाच्या क्षमतेवर अवलंबून राहिल. बोलताना शब्द जपून वापरा.
सिंह : मागील काही कटू अनुभवांपासून शिका आणि तुमच्या जीवनशैलीत काही बदल करा, असा सल्ला श्रीगणेश देतात. आज तुम्हाला जीवनात सुरू असलेल्या त्रासांपासून आराम मिळेल. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. कोणीतरी अज्ञात व्यक्ती तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल सावध राहा. आज कोणाच्याही चर्चेत पडू नका. व्यवसाय क्षेत्रातील प्रत्येक कार्य आपल्या देखरेखीखाली करा. कौटुंबिक वातावरण मधुर आणि आनंददायी राहील.
कन्या : आज मनाप्रमाणे काहीतरी घडल्यामुळे आनंद होईल, असे श्रीगणेश सांगतात. जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मबल वाढवेल. तुम्हाला कामाचा अतिरिक्त भार वाटेल. सर्व कामे वेळेवर पूर्ण होऊ शकत नाहीत. दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. कामाच्या ठिकाणी कोणाच्याही समोर तुमच्या कामाच्या शैलीचा उल्लेख करू नका.
तूळ : आज तुम्ही तुमच्या सकारात्मक आणि संतुलित विचाराने तुमची सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू कराल. दुपारची स्थिती अधिक लाभदायक असेल, म्हणजे वेळेचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे, असे श्रीगणेश सुचवितात. मित्र किंवा बाहेरच्या व्यक्तीसोबत पैशांची देवाणघेवाण करण्याच्या सूचनेमुळे वाद होऊ शकतात.
वृश्चिक : आज कुटुंबीयांसह खरेदीसारख्या कामांमध्ये चांगला वेळ जाईल. कुटुंब व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील, असे श्रीगणेश सांगतात. शेजाऱ्यांशी काही प्रकारचे मतभेद किंवा भांडण होऊ शकते. इतरांच्या कामात ढवळाढवळ न करता स्वतःच्या कामावर ठाम रहा. मुलांशी संबंधित कामांमध्येही वेळ व्यस्त राहील. वैयक्तिक कामांमुळे आज तुम्ही तुमच्या व्यवसायात जास्त लक्ष देऊ शकणार नाही.
धनु : तुम्ही एखादी नवीन वस्तू किंवा नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आजच त्याची अंमलबजावणी करा, असा सल्ला श्रीगणेश देतात. मुलांच्या कोणत्याही यशाने घरात आनंदाचे वातावरण राहील. अचानक काही अनावश्यक खर्च येऊ शकतात. कधी कधी तुमच्या मनाप्रमाणे काम न केल्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ व्हाल. तुमचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान कमी होऊ देऊ नका.
मकर : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या अनेक संधी मिळतील. त्यामुळे कोणत्याही फोन कॉलकडे दुर्लक्ष करू नका. इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. एखादा मित्र किंवा नातेवाईक तुमच्या भावनांचा गैरफायदा घेऊ शकतात.
कुंभ : आज रखडलेले महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची चांगली शक्यता असल्याचे श्रीगणेश सांगतात. पूर्ण मेहनत आणि निष्ठेने तुमचे काम करा; तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम मिळेल. सामाजिक कार्यातही तुमचे विशेष स्थान असेल. तुमचे काही जवळचे मित्र किंवा नातेवाईक तुमच्याविरुद्ध काही अफवा पसरवू शकतात. त्यामुळे काळजी घ्या. विद्यार्थी आणि तरुणांनी आपले ध्येय गमावू नये. नोकरीत पदोन्नतीची शक्यता.
मीन : मित्र किंवा नातेवाईकांबद्दलचे गैरसमज दूर होतील, असे श्रीगणेश सांगतात. परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळत आहे. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा. काम जास्त असले तरी घर आणि कुटुंबाला योग्य वेळ द्याल. रागावून आणि आवेगपूर्ण होऊन तुमचे काम बिघडू शकते याची जाणीव ठेवा. इतरांच्या कामात विनाकारण ढवळाढवळ करू नका. आर्थिक समस्या आणि त्रास तुमच्या कामात अडथळा आणतील. आज व्यवसायाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
The post Horoscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? appeared first on पुढारी.
मेष : श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही तुमची कामे योग्य प्रकारे पूर्ण करू शकाल. विरोधक माघार घेतील. समाजातही मान-सन्मान वाढेल. घराशी संबंधित कोणत्याही कामात खर्चावर नियंत्रण ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. वृषभ : स्थलांतरासंदर्भात योजना आखली जात असेल तर ती सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा …
The post Horoscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? appeared first on पुढारी.