ऑगर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड; उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्यात पुन्हा अडथळा
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये कोसळलेल्या बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना येत्या काही तासांत बाहेर काढण्यात यश मिळू शकेल, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) गुरुवारी सांगण्यात आले होते. मात्र आता या रेस्क्यूबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ऑगर ड्रिलिंग मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने उत्तरकाशी बोगद्यावरील बचावकार्य पुन्हा थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बचाव पथक कामगारांना परत आणण्यासाठी रस्ता शोधण्यापासून “केवळ काही मीटर दूर” आहे. सावधगिरी बाळगत हे बचावकार्य लवकरच पूर्ण होईल असंही ते म्हणाले.
एनडीएमए सांगितल्यानुसार, अडकलेल्या कामगारांसाठी प्रत्येकी एक अशा ४१ रुग्णवाहिका बोगद्याच्या ठिकाणी आहेत आणि कामगारांना बाहेर काढल्यानंतर कामगारांना विमानाने नेण्यासाठी सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे कोसळलेल्या बोगद्यात अडकलेल्या ४१ बांधकाम कामगारांना वाचवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यांना वाचवण्यासाठी एकाच वेळी पाच ऑपरेशन्सवर काम सुरू केले होते, तर सिल्क्यरा टोकावरील एक सर्वात आशादायक आहे.
उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथे १२ नोव्हेंबरला एक बोगदा कोसळला आणि यात ४१ मजूर अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. हे बचाव कार्य आता अंतिम टप्प्यात आले आहे. गुरुवारी उर्वरित १८ मीटरचे खोदकाम सुरू करण्यात आले. मात्र काही अंतर खोदकाम केल्यानंतर ढिगार्यामध्ये लोखंडी रॉड आल्याने खोदकाम थांबवावे लागले. तज्ञांच्या मदतीने हे लोखंडी रॉड कापून पुन्हा खोदकाम सुरू करण्यात आले. दरम्यान, पुढील खोदकाम अजुनही सुरू आहे.
Uttarkashi tunnel incident: Drilling work halted again after technical snag in auger machine, CM Dhami to stay overnight at site
Read @ANI Story | https://t.co/YP7bOS5jIv#UttarkashiRescue #CMDhami #TunnelRescue pic.twitter.com/CPkxbfFT4U
— ANI Digital (@ani_digital) November 23, 2023
The post ऑगर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड; उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्यात पुन्हा अडथळा appeared first on पुढारी.
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये कोसळलेल्या बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना येत्या काही तासांत बाहेर काढण्यात यश मिळू शकेल, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) गुरुवारी सांगण्यात आले होते. मात्र आता या रेस्क्यूबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ऑगर ड्रिलिंग …
The post ऑगर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड; उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्यात पुन्हा अडथळा appeared first on पुढारी.