नाशिक : सप्तशृंग गडावरील जंगलात अनोळखी इसमाचा मृतदेह; घातपाताचा संशय
सप्तशृंग गड, Bharat Live News Media वृत्तसेवा : सप्तशृंग गडावरील डोंगराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात ३० ते ३५ वर्षाच्या पुरुषाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आज (दि.२५) मृतदेह आढळून आला. या इसमाने जीवन संपवले की त्याचा घातपात करण्यात आला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
सप्तशृंगगडावरील ग्रामस्थांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी कळवण ओतुर येथील डॉ . प्रशांत बहिरम यांच्या देखरेखीखाली मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. व्यक्तीचा मृत्यू होऊन दहा ते बारा दिवस झाल्याने मृतदेहाची ओळख पटणे कठीण झाले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस कर्मचारी शरद शिंदे, आदेश भामरे, निलेश शेवाळे, सचिन राऊत करत आहे.
हेही वाचा :
धूलिवंदन खेळून तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू, जळगावमधील घटना
Sangli MD drugs Seized : सांगलीत मोठी कारवाई : इरळी येथून २४५ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; ६ जणांना अटक
Nashik Crime | अपहृत परप्रांतीय मुलीची नाशिकमध्ये सुटका, दोघा अपहरणकर्त्यांना पकडलं
Latest Marathi News नाशिक : सप्तशृंग गडावरील जंगलात अनोळखी इसमाचा मृतदेह; घातपाताचा संशय Brought to You By : Bharat Live News Media.