धूलिवंदन खेळून तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा- धूलिवंदन खेळून आंघोळीसाठी गेलेल्या धरणगाव येथील एका तरुणाचा धरणगाव तालुक्यातील जांभोरे गावाजवळ बुडून मृत्यू झाला. (दि. २५) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना उघड झाली. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धरणगाव येथील ज्ञानेश्वर काशिनाथ महाजन हा तरुण सकाळी धूलिवंदन खेळल्यानंतर आपल्या तीन ते चार मित्रांसोबत धरणगावजवळ असलेल्या जांभोरा शिवारात असलेल्या तलावावर अंघोळीसाठी गेला होता. अंघोळीसाठी पाण्यात उडी घेतल्यानंतर काही वेळातच ज्ञानेश्वर बुडायला लागला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.. तो आई, वडील, भाऊ, बहिणीसह राहत होता. मोलमजुरी करून त्याचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.
हेही वाचा :
Nashik Crime | अपहृत परप्रांतीय मुलीची नाशिकमध्ये सुटका, दोघा अपहरणकर्त्यांना पकडलं
IPL Full Schedule Updates : आयपीएलचे उर्वरित वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार फायनल
Latest Marathi News धूलिवंदन खेळून तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.