AAP ला खलिस्तानवाद्यांकडून 133 कोटींची देणगी : दहशतवादी पन्नूचा दावा
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खलिस्तानवाद्यांकडून तब्बल 134 कोटी रुपयांची देणगी घेतली आहे. या देणगीच्या बदल्यात त्यांनी भुल्लरला सोडण्याचे आश्वासन दिले होते. खलिस्तानी लोकांशी झालेल्या बैठकीत ही डील झाली होती,’ असा दावा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने केल्याचे समोर आले आहे.
शीख फॉर जस्टिस (SFJ) ही एक दहशतवादी संघटना आहे. पन्नू हा या संघटनेचा प्रमुख आहे. नुकताच त्याने अडीच मिनिटांचा व्हिडिओ जारी केला आहे. ज्यात त्याने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, आम आदमी पार्टी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पन्नू व्हिडिओअमध्ये म्हणतो की, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 2014 ते 2022 दरम्यान विदेश दौरे केले. यावेळी त्यांच्या सोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील होते. या दौ-यादरम्यान केजरीवाल आणि मान यांनी 16.7 दशलक्ष डॉलर्स जमा केले.
पन्नूने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘अरविंद केजरीवाल स्वत:ला प्रामाणिक हिंदू म्हणवतात पण ते अप्रामाणिक हिंदू आहेत. 2014 मध्ये जेव्हा त्यांच्याकडे सत्ता नव्हती, तेव्हा ते अमेरिकेत आले आणि त्यांनी न्यूयॉर्कमधील खलिस्तानींना वचन दिले की त्यांचे सरकार स्थापन झाल्यास, प्राध्यापक देविंदर पाल सिंग भुल्लरला 5 तासांच्या आत सोडले जाईल. पण सत्तेत येऊनही भुल्लरची सुटका झाली नाही. केजरीवाल यांनी आश्वासन मोडले.’
पन्नूने पुढे बोलताना, ‘केजरीवाल यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री भगवंत मान पंजाबमध्ये खलिस्तानींच्या विरोधात खोट्या पोलिस चकमकी घडवून आणत आहेत,’ असाही आरोप केला आहे.
पन्नू ज्या देविंदर पाल सिंग भुल्लरबद्दल बोलत आहेत, त्याने 1993 मध्ये दिल्लीत कारमध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणला होता. भुल्लरच्या त्या दहशतवादी कृत्यात 9 जणांचा मृत्यू झाला होता, तर 30 हून अधिक लोक जखमी झाले होते. युवक काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भुल्लरने तो स्फोट घडवून आणला होता. यामध्ये युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष एम.एस.बिट्टा हे जखमी झाले होते. भुल्लर सध्या तुरुंगात आहे. त्याला फाशीची शिक्षा झाली पण नंतर ही शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली.
पन्नूच्या आरोपांवर आम आदमी पक्षाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना 21 मार्च 2024 रोजी दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहेत.
Latest Marathi News AAP ला खलिस्तानवाद्यांकडून 133 कोटींची देणगी : दहशतवादी पन्नूचा दावा Brought to You By : Bharat Live News Media.