डॉ. सुभाष भामरेंनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट, नाशिकच्या उमेदवारीविषयी गुप्तगू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिकच्या जागेवरून महायुती आणि महाविकास आघाडीतही ताणातणी सुरू असताना धुळे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. या भेटीत नाशिकच्या उमेदवारीविषयी ‘गुप्तगू’ झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ही भेट राजकीय नसल्याचे नमूद करत आपण महाराजांचे फक्त आशीर्वाद घेण्यासाठी आलो … The post डॉ. सुभाष भामरेंनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट, नाशिकच्या उमेदवारीविषयी गुप्तगू appeared first on पुढारी.

डॉ. सुभाष भामरेंनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट, नाशिकच्या उमेदवारीविषयी गुप्तगू

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा-नाशिकच्या जागेवरून महायुती आणि महाविकास आघाडीतही ताणातणी सुरू असताना धुळे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. या भेटीत नाशिकच्या उमेदवारीविषयी ‘गुप्तगू’ झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ही भेट राजकीय नसल्याचे नमूद करत आपण महाराजांचे फक्त आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे भामरे यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिकच्या उमेदवारीवरून महायुतीतील घटक पक्ष आपापसांत भिडली आहेत. त्यामुळे महायुतीचा नाशिकचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीतही नाशिकच्या उमेदवारीबाबत कमी-अधिक प्रमाणात तीच स्थिती आहे. यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. शांतिगिरी महाराज हे जनार्दनस्वामी यांचे उत्तराधिकारी आहेत. त्यांचा मोठा भक्तपरिवार आहे. देशभरात त्यांचे ११५ आश्रम असून, ते ७ गुरुकुलदेखील चालवितात. अनुष्ठानच्या माध्यमातून शांतिगिरी महाराजांनी व्यसनमुक्तीसाठी मोठे कार्य केले आहे. नाशिकमधून शांतिगिरी महाराज निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. महायुती वा महाविकास आघाडीकडून त्यांनी उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश मिळू न शकल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. धुळे मतदारसंघातून सुभाष भामरे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे. भामरे यांना विरोध असताना ही उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भामरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. भामरे यांनी सोमवारी (दि.२५) नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शांतिगिरी महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज आलो होतो. राजकीय भेट नाही. फक्त दर्शनासाठी आलो आहे. त्यांचे भक्तगण मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या संपर्कात मी आहे, असे भामरे यांनी सांगितले.
महाराजांबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय
ग्रामीण भागात मी सिंचनाचे काम केले आहे. मला बाबांचे आशीर्वाद मिळाले आहेत. मी लहान कार्यकर्ता आहे. बाबांसंदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील. बाबा नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढत आहेत. मात्र, त्यांना पाठिंबा देण्याचा विषय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे डॉ. भामरे यांनी सांगितले.
शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम
दरम्यान, या भेटीनंतर शांतिगिरी महाराज म्हणाले की, इथे बाबांचा धर्मपीठ आहे. हे धर्मपीठ सर्वांसाठी खुले आहे. जे श्रद्धेने इथे येतात त्या सगळ्यांना आशीर्वाद मिळतो. मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे आणि मी जिंकून येणार आहे. आमची कमिटी विविध पक्षांसोबत चर्चा करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट
हेही वाचा —

Nagpur News: शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजू पारवे म्हणाले, ‘काँग्रेसमध्ये हुकूमशाही’!
Annasaheb Patki | सांगली: ज्येष्ठ नेते आण्णासाहेब पत्की यांचे निधन
Nashik Drugs News | शहरात ड्रग्ज विक्री सुरुच, नाशिकरोडला एकाकडून ३२ ग्रॅम साठा जप्त 

Latest Marathi News डॉ. सुभाष भामरेंनी घेतली शांतिगिरी महाराजांची भेट, नाशिकच्या उमेदवारीविषयी गुप्तगू Brought to You By : Bharat Live News Media.