शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजू पारवे म्हणाले, ‘काँग्रेसमध्ये हुकूमशाही’!

नागपूर: पुढारी वृत्तसेवा; मी चॅलेंज स्वीकारणारा आमदार आहे. जिल्ह्यामध्ये पक्षात झुंडशाही, हुकूमशाही सुरू असल्याने आपण काँग्रेस पक्ष सोडला. अशी भूमिका रविवारी काँग्रेसला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणारे उमरेडचे माजी आमदार राजू पारवे यांनी व्यक्त केली. काँग्रेसकडून आमदारकी मिळवताना हुकूमशाही दिसली नाही का? असा संताप काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केल्याने रामटेक लोकसभेची लढाई … The post शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजू पारवे म्हणाले, ‘काँग्रेसमध्ये हुकूमशाही’! appeared first on पुढारी.
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजू पारवे म्हणाले, ‘काँग्रेसमध्ये हुकूमशाही’!

नागपूर: Bharat Live News Media वृत्तसेवा; मी चॅलेंज स्वीकारणारा आमदार आहे. जिल्ह्यामध्ये पक्षात झुंडशाही, हुकूमशाही सुरू असल्याने आपण काँग्रेस पक्ष सोडला. अशी भूमिका रविवारी काँग्रेसला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणारे उमरेडचे माजी आमदार राजू पारवे यांनी व्यक्त केली. काँग्रेसकडून आमदारकी मिळवताना हुकूमशाही दिसली नाही का? असा संताप काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केल्याने रामटेक लोकसभेची लढाई रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. सोमवारी नागपूर विमानतळावर राजू पारवे यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत झाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. (Nagpur News)
गेले काही दिवस त्यांच्या शिवसेना प्रवेश व लोकसभा उमेदवारी विषयीची चर्चा होती. अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरी येत्या 27 मार्च रोजी नागपूरचे भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रामटेकचे शिवसेना उमेदवार राजू पारवे सोबतच नामांकन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. (Nagpur News)
पारवे यावेळी म्हणाले, आपला प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झाला यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल मला सर्वांचा पाठींबा आहे. हजारो काँग्रेस कार्यकर्ते माझ्यासोबत येतील, उमरेड मतदारसंघात जो काही विकास झाला आहे. त्यामध्ये महायुती सरकारने मोठे योगदान दिल्याने विकासाला गती मिळाली. रामटेक लोकसभेत सर्वांगीण विकास व्हायला हवा यासाठी मी पक्ष प्रवेश केला आहे. मी ज्या पद्धतीने माझ्या भागात काम करत होतो, त्यावरून मला पक्षाला उमेदवारी मागण्याची गरज नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 400 पारमध्ये रामटेक असेल आणि त्यांच्याच विकासावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला. विकासाचा प्रमुख मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असे स्पष्ट केले. (Nagpur News)
Latest Marathi News शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजू पारवे म्हणाले, ‘काँग्रेसमध्ये हुकूमशाही’! Brought to You By : Bharat Live News Media.