पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डाळज नं. १ येथे एसटीचा भीषण अपघात; तिघेजण ठार
इंदापूर/पळसदेव : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील डाळज नं.१ नजीक एसटी आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यात रवींद्र रावसाहेब जगताप (वय ३२ रा. डाळज नंबर १, ता. इंदापूर) व करे (संपूर्ण नाव माहिती नाही. रा एकशिव, ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर) असे मृत झालेल्या इसमांची नावे आहेत. यामध्ये एसटी बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत.
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीवरून हा तिहेरी अपघात झाला असून एम.एच.१२ सी. यू. ८१२५ या क्रमांकाची एसटी ही पुण्याकडून सोलापूर दिशेने निघाली होती. दरम्यान इंदापूरच्या दिशेने निघालेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीला एसटीने पाठीमागून धडक दिली. यात दुचाकीवरून इंदापूरहून कामावरून डाळजकडे घरी जात असताना रवींद्र जगताप हा ट्रॅक्टरने एसटीला धडक दिल्यानंतर त्याचा धक्का लागून मृत झाला.
या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून गुरुवारी (दि. २३) रात्री दरम्यान हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. पुढील तपास भिगवन पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.
The post पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डाळज नं. १ येथे एसटीचा भीषण अपघात; तिघेजण ठार appeared first on पुढारी.
इंदापूर/पळसदेव : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील डाळज नं.१ नजीक एसटी आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यात रवींद्र रावसाहेब जगताप (वय ३२ रा. डाळज नंबर १, ता. इंदापूर) व करे (संपूर्ण नाव माहिती नाही. रा एकशिव, ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर) असे मृत झालेल्या …
The post पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डाळज नं. १ येथे एसटीचा भीषण अपघात; तिघेजण ठार appeared first on पुढारी.