JNU च्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी संघटनेचा विजय, ABVPचा पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : JNU Election Results : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या ऑल इंडिया स्टुडंट्स युनियनने बाजी मारली आहे. एआयएसयुने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि संयुक्त सचिव अशा चारही जागा जिंकून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव केला आहे. चार वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत ऑल इंडिया स्टुडंट्स … The post JNU च्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी संघटनेचा विजय, ABVPचा पराभव appeared first on पुढारी.

JNU च्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी संघटनेचा विजय, ABVPचा पराभव

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : JNU Election Results : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या ऑल इंडिया स्टुडंट्स युनियनने बाजी मारली आहे. एआयएसयुने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि संयुक्त सचिव अशा चारही जागा जिंकून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव केला आहे.
चार वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) चे धनंजय यांनी 2,598 मते मिळवून जेएनयूएसयूचे अध्यक्षपद पटकावले. तर एबीव्हीपीचे उमेश सी अजमीरा यांना केवळ 1,676 मते मिळाली. धनंजय यांच्या विजयामुळे जवळपास तीन दशकांनंतर जेएनयु विद्यार्थी संघाला डाव्या-समर्थित गटाचा दलित अध्यक्ष मिळाला. ते मूळचे बिहारचे आहेत. त्यांच्या आधी 1996-97 मध्ये बत्तीलाल बैरवा हे पहिले दलित अध्यक्ष बनले होते.
सरचिटणीसपदावर डाव्यांच्या प्रियांशी आर्य यांना 3307 तर अभाविपच्या अर्जुन आनंद यांना 2309 मते मिळाली. संयुक्त सचिवपदी डावे उमेदवार मोहम्मद साजिद यांनी 2893 मते मिळवून विजय मिळवला. तर अभाविपचे गोविंद डांगी यांना 2496 मते मिळाली.
साडेसात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी केले मतदान
जेएनयूमध्ये तब्बल चार वर्षांनी निवडणूक झाली. 22 मार्च रोजी विक्रमी 73 टक्के मतदान झाले. गेल्या 12 वर्षांत पहिल्यांदाच इतके मतदान झाले आहे. यापूर्वी 2019 मध्ये 67.9 टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत साडेसात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी मतदान केले. मतदानासाठी 17 मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती. जेएनयूएसयू केंद्रीय पॅनेलसाठी एकूण 19 उमेदवार रिंगणात होते. केंद्रीय पॅनेलमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सहसचिव आणि सरचिटणीस यांचा समावेश होता. शाळेच्या समुपदेशकासाठी 42 जणांनी नशीब आजमावले. अध्यक्षपदासाठी 8 उमेदवारांमध्ये लढत होती.
खाली पाहा कुणाली किती मते (JNU Election Results)
अध्यक्ष
1. धनंजय (डावे): 2973
2. उमेशचंद्र अजमिरा (ABVP): 2039
उपाध्यक्ष
1. अविजित घोष (डावे): 2649
2. दीपिका शर्मा (ABVP): 1778
सरचिटणीस
1. प्रियांशी आर्य (डावे समर्थित): 3307
2. अर्जुन आनंद (ABVP): 2309
सहसचिव
1.मोहम्मद साजिद (डावे): 2893
2. गोविंद डांगी (ABVP): 2496

JNUSU ELECTIONS
CENTRAL PANEL
Final count
After 5656 counted ballots
President :
Dhananjay ( AISA- United Left)- 2598 (Won)
Abhijeet Kumar (INDP)- 58
Afroz Alam (CRJD)- 36
Aradhana Yadav (SCS)- 245
Biswajit Minji (BAPSA)- 398
United left won by 922 votes.
— AISA (@AISA_tweets) March 24, 2024

Latest Marathi News JNU च्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी संघटनेचा विजय, ABVPचा पराभव Brought to You By : Bharat Live News Media.