माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश
शिरूर: Bharat Live News Media वृत्तसेवा: शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव – पाटील मंगळवारी (दि. २६) राष्ट्रवादी अजित पवार गटात अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंचर (ता. आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात हा प्रवेश होणार आहे. याबाबतची माहिती आढळराव यांनी आज (दि.२५) ‘Bharat Live News Media न्यूज’ला दिली.
ते पुढे म्हणाले की, महायुतीतील तिन्ही पक्षाचा सहमतीचा उमेदवार म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी निश्चित झाली आहे. माझ्याबरोबर ठराविकच कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे सगळेच प्रमुख पदाधिकारी महायुतीचा घटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, जिल्हा प्रमुख शरद सोनवणे, भगवान पोखरकर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. परंतु, ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार नाहीत. या प्रसंगी केवळ आढळराव यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होणार नाही. दिल्लीतून ग्रीन सिंगल आल्यानंतर महायुतीच्या एकत्रितपणे उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.
हेही वाचा
Loksabha election | पुणे काँग्रेसमध्ये नाराजी; धंगेकरांच्या उमेदवारीवरून अंतर्गत प्रतिप्रश्न
loksabha election : स्वाभिमानी पुणेकरांच्या हितासाठी..; आ. रवींद्र धंगेकरांच विधान चर्चेत
पुणे भाजपात नाराजी; मुळीक, काकडेंची महायुतीच्या बैठका, कार्यक्रमांना दांडी
Latest Marathi News माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश Brought to You By : Bharat Live News Media.