सोडियम क्लोराईडने भरलेला ट्रक उलटला, चालकासह क्लीनरचा मृत्यू
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा- मुक्ताईनगर शहरा जवळ राष्ट्रीय महामार्गावर सोडियम क्लोराइडने भरलेला ट्रक उलटून चालक व क्लीनर दोघांचाही दुर्दैवी अंत झाला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल तिरंगा, मलकापूर रोड जवळ (दि. 24) च्या रात्री सोडियम क्लोराइड ने भरलेला ट्रक क्रमांक (जी जे 03 ए झेड 63 39) हा अचानक पलटी झाला. यात ट्रक चालक आणि क्लीनर हे दोघेही ट्रक खाली दाबले गेल्याने गंभीर जखमी झाले होते. दोघांना ट्रक खालून काढून लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळतात परिसरातील नागरिक यांनी अपघात स्थळी येऊन क्लीनर व ड्रायव्हरला बाहेर काढण्यास मदत केली. मात्र, या दोन्ही जणांचा रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा :
कांदा निर्यातबंदी कायमच! कांद्याचा उत्पादन खर्च निघेणा
Success Story of a farmer Nashik | ओसाड माळरानावर पिकवली ‘ड्रॅगन’ शेती
Latest Marathi News सोडियम क्लोराईडने भरलेला ट्रक उलटला, चालकासह क्लीनरचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.