Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे पक्षाला माेठा धक्का बसला आहे. उत्तर भारतात आज (दि.२५) सर्वत्र होळीचा सण साजरा केला जात आहे. केजरीवाल यांना झालेल्याअटकेच्या निषेध करत या वर्षी हाेळीला रंग खेळणार नाही, होळी साजरी करणार नसल्याचा संकल्प आम आदमी पार्टीने केला आहे. या संदर्भातील माहिती मंत्री अतिशी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून दिली आहे. (Holi 2024 Updates)
आम्ही रंग खेळणार नाही, होळी साजरी करणार नाही- मंत्री अतिशी
मंत्री अतिशी यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, होळी हा केवळ सण नसून, वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, क्रूरतेवर न्यायाचे प्रतीक आहे. आज आम आदमी पार्टीचा प्रत्येक नेता रात्रंदिवस या दुष्ट, क्रूरता आणि अन्यायाविरुद्ध लढत आहे. त्यामुळे या वर्षी आम आदमी पक्षाने संकल्प केला आहे की, आम्ही रंग खेळणार नाही, आम्ही होळी साजरी करणार नाही; कारण क्रूर हुकूमशहाने दिल्लीचे लाडके मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकले आहे. आज त्यांनी देशातून लोकशाही संपवण्याच्या प्रयत्नात कोणतीही कसर सोडलेली नाही, असा आरोप देखील मंत्री आतिशी यांनी सरकार आणि तपास यंत्रणांवर केला आहे. (Holi 2024 Updates)
क्रूरता आणि वाईट विरूद्धच्या लढाईत साथ द्या
या होळीनिमित्त मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की, क्रूरता आणि वाईट विरुद्धच्या या लढाईत आमच्या सोबत सहभागी व्हा. ही केवळ ‘आप’ची लढाई नाही, तर संपूर्ण दिल्ली आणि देशाची लोकशाही वाचवण्यासाठीची ही लढाई आहे, असे देखील मंत्री अतिशी यांनी आप कार्यकर्त्यांसह देशवासियांना आवाहन केले आहे. (Holi 2024 Updates)
होली सिर्फ़ एक त्योहार नहीं, बल्कि बुराई के ऊपर अच्छाई की जीत का प्रतीक है, क्रूरता के ऊपर इंसाफ़ का प्रतीक है।
आज, आम आदमी पार्टी का हर नेता दिन रात इसी बुराई, क्रूरता और नाइंसाफ़ी से लड़ रहा है। इस साल आम आदमी पार्टी ने संकल्प किया है कि हम रंगों से नहीं खेलेंगे, होली नहीं…
— Atishi (@AtishiAAP) March 25, 2024
हेही वाचा:
Arvind Kejriwal | केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीत ‘इंडिया’ आघाडी घेणार महासभा
Arvind Kejriwal Arrested Live Updates: ‘ईडी’ कोठडीतून मुख्यमंत्री केजरीवालांचा राज्यकारभार; ‘जल’विभागाला दिला पहिला आदेश
Sukesh on Arvind Kejriwal| ‘वेलकम टू तिहार’! केजरीवालांचा मुखवटा फाडणार; सुकेशचे तुरूंगातून पत्र
Latest Marathi News रंग खेळणार नाही, होळी साजरी करणार नाही; : ‘AAP’चा संकल्प Brought to You By : Bharat Live News Media.