जामनेर पोलिसांकडून दोन दिवसांत 3 लाखांची दारु, रसायने नष्ट

जळगाव- जामनेर पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील अवैध गावठी हातभट्टी दारू विरुद्ध मोहीम सुरू केलली आहे. या मोहिमेत गेल्या दोन दिवसांत 3 लाख 40 हजार रुपयांची अवैध हातभट्टी दारू रसायने नष्ट करण्यात आलेली आहे. जामनेर तालुक्यात दि. 23 व 24 रोजी जामनेर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अवैध हातभट्टी दारू व्यवसायकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करून हातभट्टी तयार … The post जामनेर पोलिसांकडून दोन दिवसांत 3 लाखांची दारु, रसायने नष्ट appeared first on पुढारी.

जामनेर पोलिसांकडून दोन दिवसांत 3 लाखांची दारु, रसायने नष्ट

जळगाव- जामनेर पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील अवैध गावठी हातभट्टी दारू विरुद्ध मोहीम सुरू केलली आहे. या मोहिमेत गेल्या दोन दिवसांत 3 लाख 40 हजार रुपयांची अवैध हातभट्टी दारू रसायने नष्ट करण्यात आलेली आहे.
जामनेर तालुक्यात दि. 23 व 24 रोजी जामनेर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अवैध हातभट्टी दारू व्यवसायकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करून हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे व पक्के रसायन तीन लाख रुपयांचे नऊ ठिकाणी छापा मारून नष्ट केले. यात तालुक्यातील शहापूर या ठिकाणी दि. 23 रोजी विनोद सुंदरलाल जोशी राहणार वाकडी दुर्योधन, उदयभान भिल राहणार शहापूर, रवींद्र रंगनाथ सुरवाडे राहणार शहापूर यांच्या अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर रेड मारून 2100 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन कच्चे पक्के एक लाख पाच रुपयाचं मुद्देमाल नष्ट केला.
तर दि. 24 रोजी शेळगाव शेडगाव येथे अलकाबाई नाना कोळी राहणार तळेगाव , अरुण सीताराम कुडी, ईश्वर सिताराम कोळी राहणार तळेगाव, भागदरा गोकुळ, पिंटू जोगी सा प्रकाश सुभाष शिंदे, गजानन गंगाराम कोळी, गोविंदा कृष्ण ब्राम्हदे यांच्या अवैध हातभट्टी तयार करण्याच्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापा मारला असता 4800 लिटरचे गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन बाजार मूल्य दोन लाख 40 हजार रुपयाचे मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे नेतृत्वात, पोउपनिरी सागर काळे, पोहेका राकेश वराडे, रविंद्र बिर्हाडे, मुकुंद पाटील, राजु तायडे, पोना/चंद्रशेखर नाईक पोशि ज्ञानेश्वर देशमुख, पांडुरंग पाटील, तुषार पाटील, निलेश घुगे, सचिन पाटील, राजेश लहासे, अमोल वंजारी, यांनी करवाई केली आहे.
हेही वाचा –

Ruchira Jadhav : बोल्ड रुचिरा जाधव ‘राजा येईल गं’ चित्रपटातून भेटीला
दूध अनुदानाचे नगण्य वाटप; मोजक्याच डेअर्‍यांना मिळाले अनुदान
हिंगोली : संत्र्याची वाहतूक करणारा ट्रक उलटला; एकाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

Latest Marathi News जामनेर पोलिसांकडून दोन दिवसांत 3 लाखांची दारु, रसायने नष्ट Brought to You By : Bharat Live News Media.