हिंगोलीत संत्र्याच्या ट्रकचा अपघात; एकजण ठार, एक जखमी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा आखाडा बाळापूर ते डोंगरकडा मार्गावर भाटेगाव शिवारात संत्री घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. आज (सोमवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अमरावतीकडून एका ट्रकमध्ये संत्र्याचे कॅरेट भरून ट्रक नांदेडकडे जात होता. आज सोमवार सकाळी ट्रक आखाडा … The post हिंगोलीत संत्र्याच्या ट्रकचा अपघात; एकजण ठार, एक जखमी appeared first on पुढारी.

हिंगोलीत संत्र्याच्या ट्रकचा अपघात; एकजण ठार, एक जखमी

हिंगोली, Bharat Live News Media वृत्तसेवा आखाडा बाळापूर ते डोंगरकडा मार्गावर भाटेगाव शिवारात संत्री घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. आज (सोमवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
अमरावतीकडून एका ट्रकमध्ये संत्र्याचे कॅरेट भरून ट्रक नांदेडकडे जात होता. आज सोमवार सकाळी ट्रक आखाडा बाळापूर ते डोंगरकडा मार्गावर भाटेगाव शिवारात आला असतांना भाटेगाव वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामध्ये ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातात ट्रकमधील संपूर्ण कॅरेट खाली पडल्याने रस्त्याच्या बाजूला संत्र्याचा सडाच पडल्याचे चित्र होते.
या अपघाताची माहिती मिळताच भाटेगाव येथील गावकरी व आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार नागोराव बाभळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व गावकऱ्यांनी ट्रकमधील जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी नांदेड येथे हलविले आहे. तर ट्रकमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, पोलिसांनी ट्रकमधील कागदपत्रे व मृताच्या खिशातील कागदपत्रांची पाहणी करून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र कागदपत्रावरून नाव समजू शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी ट्रक मालकास या घटनेची माहिती दिली आहे. ट्रक मालक आल्यानंतरच मृताचे नाव स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही.
हेही वाचा : 

Railway News | भारतीय रेल्वे सुसाट; रद्द वेटिंग तिकिटामुळे मिळालेय घसघशीत उत्पन्न 
Lok Sabha Election 2024 | खताच्या गोण्यांवर ब्रश फिरवा : कृषी विभागाच्या खत वितरकांना सूचना

Bachchu Kadu on Amravati | …तर ‘महायुती’तून बाहेर पडू, बच्चू कडूंचा इशारा, राणांच्या उमेदवारीला विरोध

Latest Marathi News हिंगोलीत संत्र्याच्या ट्रकचा अपघात; एकजण ठार, एक जखमी Brought to You By : Bharat Live News Media.