मॉस्को कॉन्सर्ट हॉल हल्ला: ३ संशयितांनी कोर्टात गुन्हा केला कबूल
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मॉस्कोमधील कॉन्सर्ट सिटी हॉलमध्ये शनिवारी २३ मार्च रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याने जग हादरले. यामध्ये १३७ नागरिकांचा मृत्यू झाला, तर शंभरहून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्याप्रकरणी ४ दहशतवाद्यांसह ११ जणांना अटक केली आहे. या हल्ल्यातील ४ संशयितांना कोर्टात हजर केले असता, तिघांनी गुन्हा कबुल केला आहे, या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. (Moscow concert hall attack)
दक्षिण-मध्य आशिया मुख्यत: अफगाणिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी गटाची प्रादेशिक शाखा इस्लामिक स्टेट-खोरासानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या प्रकरणी ११ जणांसह चार संशयितांना शनिवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ताजिकिस्तानचे नागरिक असलेल्या या ४ संशयितांना न्यायालयात हजर केले. दरम्यान, न्यायालयाने या हल्ल्यातील संशयितांना २२ मे पर्यंत चाचणीपूर्व कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (Moscow concert hall attack)
मॉस्को सिटी हॉल हल्ल्यामधील दलेरदझोन मिर्झोयेव (32), सैदाक्रामी रचाबलिझोडा (30), मुखमदसोबीर फैझोव (19) आणि शमसीदिन फरीदुनी (25) अशी संशयित दहशतवाद्यांची नावे आहे. मॉस्कोमधील बास्मान्नी जिल्हा न्यायालयाने “सामूहिक दहशतवादी हल्ला केल्याचा आरोप ठेवला आहे. ज्यामुळे अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याचेही म्हटले आहे. या गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा आहे, असे असोसिएटेड प्रेस न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Moscow concert hall attack)
हेही वाचा:
Moscow concert hall attack | मॉस्को हल्ल्यात मोठी जीवितहानी! मृतांचा आकडा ११५ वर
Moscow Terrorist Attack : ISIS ने घेतली मास्कोवरील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी
Moscow terror attack: मास्को दहशतवादी हल्ला: ४ दहशतवाद्यांसह ११ जणांना अटक
Latest Marathi News मॉस्को कॉन्सर्ट हॉल हल्ला: ३ संशयितांनी कोर्टात गुन्हा केला कबूल Brought to You By : Bharat Live News Media.