दक्षिण गोव्याचा तिढा सुटला; पल्लवी धेंपे भाजपच्या उमेदवार
पणजी : Bharat Live News Media वृत्तसेवा : अत्यंत हुशार कर्तबगार मृदू भाषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, पुणे विद्यापीठातून एमबीएची पदवी प्राप्त केलेल्या उच्च्च शिक्षित, अनेक कंपन्यांच्या संचालकपदी विराजमान असलेल्या व उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांच्या पत्नी आणि पर्येच्या आमदार देविया राणे यांची चुलत बहीण असलेल्या पल्लवी धेंपे (Pallavi Dhempe) आता भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार असणार आहेत. त्यांच्या उमेदवारीची घोषणा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत रविवारी केली. पल्लवी धेंपे यांचे नाव नवी दिल्ली (BJP Candidate List) येथून जाहीर करण्यात आल्याचे तानावडे यांनी सांगितले. (Lok Sabha Election 2024)
पल्लवी धेंपे (Pallavi Dhempe) यांना उमेदवारी मिळाल्यामुळे दक्षिण गोव्यातील मतदारांना निश्चितच नवा उमेदवार म्हणून नव्या चेहऱ्याकडे पहावे लागणार आहे. उमेदवार कोणीही असो, सर्वसामान्यांशी संपर्क असो किंवा नसो पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीच यंदाचे मतदान होणार आहे, असे तानावडे म्हणाले. (Lok Sabha Election 2024)
दक्षिणेतील ख्रिश्चन समुदायातही धेंपे (Pallavi Dhempe) कुटुंबाविषयी आदर आहे. अनेक फेस्तांमध्ये धेंपे कुटुंबाचा सक्रिय सहभाग असतो. दान धर्मात या धेंपे कुटुंबाने कधी जात-पात धर्म पाहिलेला नाही. धेंपे चॅरिटेबल ट्रस्टच्या त्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यामुळे पल्लवी धेंपे यांच्याबाबत चर्च संस्थाही कोणताच विपरित निर्णय घेणार नाहीत, असा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वास आहे. स्वतः धेंपे कुटुंबाने किंवा श्रीनिवास धेंपे यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली नाही. यापूर्वी राज्यसभा खासदारपद धेंपे कुटुंबाकडे जाणार अशी चर्चा होती. परंतु ऐनवेळी पक्षाने निर्णय बदलला होता, अशी माहिती त्यांनी दिली. (Lok Sabha Election 2024)
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पल्लवी धेंपे (Pallavi Dhempe) यांची उमेदवारी जाहीर (BJP Candidate List) करताना कार्यकर्ते व नेत्यांना धेंपे यांचा परिचय करून दिला. ‘मेरा परिवार मोदी परिवार, अबकी बार फिरसे मोदी सरकार’ तसेच अब की बार चारसो पार’ अशा घोषणा देत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पल्लवी धेंपे आणि श्रीपाद नाईक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व पदाधिकारी उपस्थित होते. आमदार देविया राणे, सुलक्षणा सावंत, माजी आमदार दामू नाईक यावेळी उपस्थित होते. प्रचार करण्यासाठी आता ४३ दिवस असून कमी वेळेत जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पल्लवी धेंपे यांना पोहोचावे लागणार आहे. राजकीय पार्श्वभूमी नसल्याने भाजप कार्यकर्त्यांनाही दक्षिण गोव्याचा उमेदवार म्हणून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. या कार्यक्रमाला भाजपच्या तीनपैकी देविया राणे आणि डिलायला लोबो या दोनच आमदार उपस्थित होत्या. जेनिफर मोन्सेरात अनुपस्थित होत्या. (Lok Sabha Election 2024)
घाईगडबडीत कार्यक्रम
उमेदवार जाहीर करण्यासाठी घाईघडबड झाली. रात्री कार्यक्रम झाल्याने अनेक मंत्री, आमदार, पदाधिकारी उपस्थित नव्हते.
पल्लवी धेपे यांचा संक्षिप्त परिचय
पल्लवी धेंपे (पूर्वाश्रमीच्या तिंबलो) या गोव्यातील उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांनी (Pallavi Dhempe) पार्वतीबाई चौगुले कॉलेज- मडगाव येथून रसायनशास्त्रात पदवी आणि एमआयटी व त्यानंतर पुणे येथून व्यवसाय व्यवस्थापन (एमबीए) मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्या धेंपे इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक आहेत. त्या व्यवसायाच्या मीडिया आणि रिअल इस्टेट विभागावर देखरेख करतात. त्या धेंपे चॅरिटीज ट्रस्टच्या विश्वस्त असून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचितांना मदत करण्यासाठी समर्पित केलेली संस्था चालवितात. त्या राज्यात प्री-युनिव्हर्सिटी लर्निंगच्या चार संस्थादेखील चालवतात. मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने ग्रामीण शाळा दत्तक कार्यक्रमांतर्गत सरकारी उच्च माध्यमिक शाळा दत्तक घेतल्या आहेत. (Lok Sabha Election 2024)
जर्मनी आणि गोवा यांच्यातील सांस्कृतिक संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या इंडो-जर्मन एज्युकेशनल अँड कल्चरल सोसायटीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेंडेल रॉड्रिक्स यांनी सुरू केलेल्या गोव्यातील फॅशन आणि टेक्सटाईल म्युझियम, मोडा गोवा फाऊंडेशनच्या त्या विश्वस्त आहेत. २०१२ ते २०१६ पर्यंत गोवा विद्यापीठाशी संलग्न शैक्षणिक परिषदेच्या सदस्या म्हणूनही काम केले आहे. त्या गोवा कॅन्सर सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्या देखील आहे. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या महिला परिषदेवरही त्या कार्यरत आहे.
पक्षाचे आभार : पल्लवी धेंपे
भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. मी दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडेन. निवडणुकीत जिंकून येईन. राजकारण माझा आवडीचा विषय पण प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी मिळाली नव्हती. आत्ता सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची संधी आली आहे, अशी प्रतिक्रिया पल्लवी धेंपे (Pallavi Dhempe) यांनी व्यक्त केली. (Lok Sabha Election 2024)
हेही वाचा :
भाजपचा दिग्गजांना ‘धक्का’, पाचव्या यादीत कोणाला संधी, कोणाचा पत्ता कट?
CM केजरीवालांनी ‘ईडी’ कोठडीतून जारी केलेल्या आदेशाची होणार चौकशी
मनमानी पद्धत बंद करा; सुप्रीम कोर्टाने पोलिसांना फटकारले
Latest Marathi News दक्षिण गोव्याचा तिढा सुटला; पल्लवी धेंपे भाजपच्या उमेदवार Brought to You By : Bharat Live News Media.