CM केजरीवालांनी ‘ईडी’ कोठडीतून जारी केलेल्‍या आदेशाची होणार चौकशी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवार, दि.२२ मार्च रोजी अटक केली. त्‍यांना 28 मार्चपर्यंत सक्‍तवसुली संचालनालय (‘ईडी’)  कोठडी (Arvind Kejriwal arrest news) सुनावण्‍यात आली आहे. ‘ईडी’ कोठडीत असताना त्यांनी दिल्‍ली सरकारला जारी केलेल्या आदेशाची तपास यंत्रणेने दखल घेतली आहे. या आदेशाची चौकशी हाेणार आहे. ( Arvind Kejriwal ED … The post CM केजरीवालांनी ‘ईडी’ कोठडीतून जारी केलेल्‍या आदेशाची होणार चौकशी appeared first on पुढारी.
CM केजरीवालांनी ‘ईडी’ कोठडीतून जारी केलेल्‍या आदेशाची होणार चौकशी


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवार, दि.२२ मार्च रोजी अटक केली. त्‍यांना 28 मार्चपर्यंत सक्‍तवसुली संचालनालय (‘ईडी’)  कोठडी (Arvind Kejriwal arrest news) सुनावण्‍यात आली आहे. ‘ईडी’ कोठडीत असताना त्यांनी दिल्‍ली सरकारला जारी केलेल्या आदेशाची तपास यंत्रणेने दखल घेतली आहे. या आदेशाची चौकशी हाेणार आहे. ( Arvind Kejriwal ED custody)
केजरीवालांच्‍या आदेशाला कायदेशीर आधार आहे का?
केजरीवाल हे ईडी कोठडीत असताना त्‍यांना सरकारला आदेश देण्‍याचे अधिकार आहेत का, अशा प्रकारची कृती ‘पीएमएलए कोर्टा’ने दिलेल्या आदेशाच्या कक्षेत आहे का? कोठडी दरम्यान सरकार चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांवर केजरीवाल स्वाक्षरी करू शकतील का, याचा ईडी चौकशी करणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, केजरीवाल त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल आणि स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांना दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत अर्धा तास भेटू शकतात, तर अर्धा तास ते त्यांच्या वकिलांना भेटू शकतात. ( Arvind Kejriwal ED custody)
केजरीवालांनी दिले जल मंत्रालयाला आदेश
शनिवार, २३ मार्च रोजी केजरीवाल यांनी ‘ईडी’च्या कोठडीतून पहिला आदेश जारी केला. हा आदेश दिल्‍लीतील जल मंत्रालयाशी संबंधित आहे. केजरीवाल यांनी आपल्‍या आदेशात जलमंत्री आतिशी यांना दिल्लीतील अनेक भागातील पिण्याचे पाणी आणि गटार समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. याबाबत आतिशी यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले होते की, दिल्लीतील काही भागात पाणी आणि गटाराच्या अनेक समस्या आहेत. आपण कारागृहात असताना दिल्‍लीतील नागरिकांच्‍या मुलभूत सुविधांची कोणतीही अडचण येऊ नये, अशी त्‍यांची भावना आहे. उन्हाळाही येऊ घातला आहे, त्यामुळे ईडीच्या कोठडीत असताना, पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी योग्य संख्येने टँकरची व्यवस्था करावी, असे आदेश त्यांनी दिले असल्‍याचेही अतिशी म्‍हणाल्‍या होत्‍या. ( Arvind Kejriwal ED custody)
तुरुंगातून टोळ्या चालतात, सरकार नाही : भाजप
तुरुंगातून  गुन्‍हेगारी टोळ्या चालवल्या जातात, सरकार नाही, असा टोला भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी लगावला आहे. तसेच केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यावरही टीका केली.
हेही वाचा : 

Arvind Kejriwal | केजरीवालांच्‍या अटकेच्‍या निषेधार्थ दिल्लीत ‘इंडिया’ आघाडी घेणार महासभा 
Arvind Kejriwal Arrest : केजरीवाल प्रकरणात भारताने जर्मनीला फटकारले

 
The post CM केजरीवालांनी ‘ईडी’ कोठडीतून जारी केलेल्‍या आदेशाची होणार चौकशी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source