भाजपचा दिग्‍गजांना ‘धक्‍का’, पाचव्‍या यादीत कोणाला संधी, कोणाचा पत्ता कट?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी ( दि. २४ मार्च ) रात्री पाचवी यादी जाहीर केली. पक्षाने केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे, व्हीके सिंह आणि वरुण गांधी यांच्यासह ३७ विद्यमान खासदारांना यांना उमेदवारी नाकारली आहे. (Lok Sabha Elections 2024 ) विशेष म्‍हणजे या यादीत बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि अभिनेता अरुण गोविल यांना स्थान … The post भाजपचा दिग्‍गजांना ‘धक्‍का’, पाचव्‍या यादीत कोणाला संधी, कोणाचा पत्ता कट? appeared first on पुढारी.
भाजपचा दिग्‍गजांना ‘धक्‍का’, पाचव्‍या यादीत कोणाला संधी, कोणाचा पत्ता कट?


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी ( दि. २४ मार्च ) रात्री पाचवी यादी जाहीर केली. पक्षाने केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे, व्हीके सिंह आणि वरुण गांधी यांच्यासह ३७ विद्यमान खासदारांना यांना उमेदवारी नाकारली आहे. (Lok Sabha Elections 2024 ) विशेष म्‍हणजे या यादीत बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि अभिनेता अरुण गोविल यांना स्थान देण्यात आले आहे. जाणून घेवूया भाजपच्‍या पाचव्‍या यादीतील ठळक वैशिष्‍ट्य…
पक्ष प्रवक्‍ते संबित पात्रा यांना पुन्‍हा उमेदवारी
भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना संबळपूरमधून उमेदवारी दिली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा पुरीमधून निवडणूक लढवणार आहेत. 2019 मध्ये या जागेवरून त्यांचा पराभव झाला होता.
सलग सहावेळा खासदार राहिलेले अनंत कुमार हेगडेंना उमेदवारी नाकारली
कर्नाटकचे सहा वेळा खासदार अनंत कुमार हेगडे यांना भाजपने तिकीट दिले नाही. त्‍यांनी नुकतेच भारतीय राज्‍यघटनेवर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.
उत्तर प्रदेशमधील ९ विद्यमान खासदारांचा उमेदवारी नाकारली
पक्षाने 37 खासदारांना तिकीट देण्यास नकार दिला आहे. उत्तर प्रदेशात नऊ, गुजरातमध्ये पाच, ओडिशात चार आणि बिहार, कर्नाटक आणि झारखंडमध्ये प्रत्येकी तीन खासदार आहेत.
भाजपमध्‍ये प्रवेश केलेल्‍या अन्‍यपक्षीय नेत्‍यांना उमेदवार
सीता सोरेन, तपस रॉय आणि एन किरण कुमार रेड्डी यांच्यासह इतर पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या अनेक नेत्यांनाही तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल यांना कुरुक्षेत्र आणि जितिन प्रसाद यांना पीलीभीतमधून उमेदवारी देण्यात आली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या भावजयी सीता सोरेन यांना दुमका येथून उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा सोडून भाजपमध्‍ये प्रवेश केला होता.
संदेशखालीतील पीडिता रेखा पात्रांना बसीरहाटमधून उमेदवारी
संदेशखळी पीडितांपैकी एक असलेल्या रेखा पात्रा यांना पश्चिम बंगालमधील बसीरहाटमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
वरुण गांधींना नाकारले, मनेका गांधींना सुलतानपूरमधून रिंगणात
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना बेगुसरायमधून तर माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना पटना साहिबमधून तिकीट मिळाले आहे. वरुण गांधी यांना यावेळी पिलीभीतमधून तिकीट मिळाले नाही. त्यांची आई मनेका गांधी यांना सुलतानपूरमधून उमेदवार बनवण्यात आले आहे.
कंगना राणावत मंडीतून तर अरुण गोविल मेरठमधून लढणार
अतुल गर्ग यांनी गाझियाबादमध्ये दोनवेळा खासदार व्हीके सिंग यांची जागा घेतली आहे. चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत मंडीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. रामायणात रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना मेरठमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी न्‍यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय तमलूकमधून उमेदवारी
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे बेळगावमधून निवडणूक लढवणार आहेत.कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय पश्चिम बंगालमधील तमलूकमधून निवडणूक लढवणार आहेत.
हेही वाचा : 

Lok Sabha Election 2024 | आचारसंहिता भंगाची तक्रार करायची तरी कोठे?
Lok Sabha Elections 2024 : तामिळनाडूमध्ये भाजप-पीएमकेचे जागावाटप ‘फायनल’! पीएम मोदींना किती फायदा होईल?
Lok Sabha elections 2024 | ‘विकसित भारत’ मेसेज WhatsApp वरुन पाठवणे थांबवा, ECI चे केंद्राला निर्देश

 
 
The post भाजपचा दिग्‍गजांना ‘धक्‍का’, पाचव्‍या यादीत कोणाला संधी, कोणाचा पत्ता कट? appeared first on Bharat Live News Media.

Go to Source