BSE, NSE होळीनिमित्त बंद, ‘या’ आठवड्यात केवळ ३ ट्रेडिंग सत्र

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजार आज सोमवारी (दि. २५ मार्च) होळीनिमित्त बंद आहे. तसेच या आठवड्यात केवळ तीन ट्रेडिंग सत्रांत बाजार खुला राहणार आहे. कारण शुक्रवारी २९ मार्च रोजी गुड फ्रायडे निमित्त बाजाराला सुट्टी आहे. करन्सी (Currency), डेब्ट (debt) आणि इक्विटी (equity) मार्केटदेखील बंद आहेत. ते मंगळवारी २६ मार्च रोजी पुन्हा सुरू होतील. (Stock … The post BSE, NSE होळीनिमित्त बंद, ‘या’ आठवड्यात केवळ ३ ट्रेडिंग सत्र appeared first on पुढारी.
BSE, NSE होळीनिमित्त बंद, ‘या’ आठवड्यात केवळ ३ ट्रेडिंग सत्र

Bharat Live News Media ऑनलाईन : भारतीय शेअर बाजार आज सोमवारी (दि. २५ मार्च) होळीनिमित्त बंद आहे. तसेच या आठवड्यात केवळ तीन ट्रेडिंग सत्रांत बाजार खुला राहणार आहे. कारण शुक्रवारी २९ मार्च रोजी गुड फ्रायडे निमित्त बाजाराला सुट्टी आहे. करन्सी (Currency), डेब्ट (debt) आणि इक्विटी (equity) मार्केटदेखील बंद आहेत. ते मंगळवारी २६ मार्च रोजी पुन्हा सुरू होतील. (Stock markets holiday)
एप्रिलमध्ये ‘या’ दिवशी बाजार राहणार बंद
११ एप्रिलला ईद-उल-फितर आणि १७ एप्रिलला रामनवमी निमित्त बाजार बंद राहणार आहे. एप्रिलमध्ये आणखी दोन सुट्ट्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) आणि महावीर जयंती (२१ एप्रिल) रविवारी सुट्टीच्या दिवशी येत आहे.
NSE निफ्टी ५० निर्देशांक शुक्रवारी ०.३९ टक्के वाढून २२,०९६ वर बंद झाला होता, तर बीएसई सेन्सेक्स ०.२६ टक्क्यांनी वाढून ७२,८३१ वर बंद झाला होता. यामुळे बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.२८ लाख कोटी रुपयांनी वाढून ३८२.१३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. गेल्या शुक्रवारी IT वगळता इतर सर्व प्रमुख क्षेत्रांनी तेजीत व्यवहार केला होता. यूएस फेडने २०२४ मध्ये व्याजदर कपातीसाठी त्यांचा दृष्टीकोन कायम ठेवल्याने आशावाद वाढला आहे. निफ्टी ऑटो, मीडिया, फार्मा आणि रियल्टी प्रत्येकी सुमारे १ टक्क्यांनी वाढून बंद झाले होते. तर निफ्टी आयटी २.३ टक्क्यांनी घसरला होता.
दरम्यान, डॉलरची मागणी वाढल्याने भारतीय रुपया शुक्रवारी प्रति यूएस डॉलर ८३.४३ या सर्वकालीन निचांकी पातळीवर गेला होता.
हे ही वाचा :

सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी तेजीत, गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा
री बॅलेन्सिंग’ प्रत्येक पोर्टफोलिओत का आहे गरजेचे?
वेध शेअर बाजाराचा; सावध ऐका पुढल्या हाका!

 
Latest Marathi News BSE, NSE होळीनिमित्त बंद, ‘या’ आठवड्यात केवळ ३ ट्रेडिंग सत्र Brought to You By : Bharat Live News Media.