loksabha Election | जिल्हा परिषद आहे की राजकीय गप्पांचा फड?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघतेय. कोण कुठे आहे? याची अजूनही चाचपणी सुरू आहे. गेल्या निवडणुकीत सोबत असलेले आता एकमेकांविरुद्ध आहेत. असे असले तरी कुठल्या ना कुठल्या कारणांनी, तर काही ठरवून होणार्‍या भेटी जिल्हा परिषदेत वाढल्यात. यात जि. प.च्या माजी पदाधिकार्‍यांसह इतर राजकीय नेतेमंडळी आवर्जून … The post loksabha Election | जिल्हा परिषद आहे की राजकीय गप्पांचा फड? appeared first on पुढारी.

loksabha Election | जिल्हा परिषद आहे की राजकीय गप्पांचा फड?

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघतेय. कोण कुठे आहे? याची अजूनही चाचपणी सुरू आहे. गेल्या निवडणुकीत सोबत असलेले आता एकमेकांविरुद्ध आहेत. असे असले तरी कुठल्या ना कुठल्या कारणांनी, तर काही ठरवून होणार्‍या भेटी जिल्हा परिषदेत वाढल्यात. यात जि. प.च्या माजी पदाधिकार्‍यांसह इतर राजकीय नेतेमंडळी आवर्जून येत आहेत. एकमेकांची खेचाखेची करीत समोरच्याचा अंदाज घेण्याची संधी एकही जण सोडत नसल्याचे चित्र सध्या जिल्हा परिषदेत बघायला मिळत आहे.
यंदाच्या निवडणुकीत पुण्यातील चार मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच बारामतीतून नणंद-भावजयीचा सामना जवळपास निश्चित झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतरची पहिली मोठी निवडणूक. त्यात पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने सर्वांनाच इथले राजकारण समजून घेण्यात इंटरेस्ट आहे. मग त्यात नेतेमंडळीही मागे नाहीत. जिल्हा परिषदेत गावोगावहून येणारे सरपंच, कार्यकर्ते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी पदाधिकारी; याशिवाय माजी महिला सदस्या, पदाधिकार्‍यांच्या पतींच्या वाहनांची ये-जा जिल्हा परिषदेत वाढली आहे. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून येणारे हे बरेच जण पूर्वीपासूनचे चांगले दोस्त आहेत. गप्पा मारताना एकाच सोफ्यावर बसत असले, तरी देखील राजकीय भूमिका वेगळ्या झाल्यात.
दोस्ती कायम ठेवत एकमेकांची मते जाणून घेत आहेत. राजकीय आडाखे कसे बरोबर पडले, कुठे चुकले, याच्या मोठ्या चर्चा झडतात. उमेदवारांचे अर्ज भरल्यानंतर पुन्हा आपल्याला इकडे फिरकायला पण वेळ मिळणार नसल्याचेही एकमेकांना सांगतात. गावोगावचे सरपंच अजूनही त्यांच्या कामानिमित्त जिल्हा परिषदेत खेटा मारत आहेत. सोबत कार्यकर्ते ठरलेलेच. मग चार नेत्यांची नावे सांगून, त्यांनी आपल्यासाठी केलेल्या कामाची आठवण सोबतच्या कार्यकर्त्यांना करून दिली जाते. पुन्हा मग दिल्लीपासून सुरू झालेल्या चर्चा बारामती, शिरूरमध्ये कशा हालचाली घडत आहेत, इथवर येऊन थांबतात.
झेडपीत ये, भेटू..!
ग्रामीण भागातून निघालेल्या पुणे शहरात भेटण्यासाठी जिल्हा परिषद हे सर्वांचे भेटण्याचे केंद्रबिंदू झाले आहे. पुण्यात भेटायचे आणि निवांत गप्पांचा फड जिल्हा परिषदेत रंगतो. राजकीय मंडळी एकमेकांना भेटण्यासाठी फोनवरच झेडपीत भेटण्याचे ठरवत आहेत. यामध्ये अधिक प्रमाण हे दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपमधील मंडळींचे जास्त आहे.
 हेही वाचा

IPL betting : IPL सामन्यांवर दुबईतून ऑनलाइन सट्टेबाजी; युपीतून १२ जणांना अटक
IPL 2024 : मुंबईचा पराभव करत गुजरात टायटन्सची विजयी सलामी
Foot Health : पादत्राणांची निवड आणि पायांचे आरोग्य

Latest Marathi News loksabha Election | जिल्हा परिषद आहे की राजकीय गप्पांचा फड? Brought to You By : Bharat Live News Media.