IPL सामन्यांवर दुबईतून ऑनलाइन सट्टेबाजी; युपीतून १२ जणांना अटक
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन सट्टेबाजी (IPL betting) करणाऱ्या १२ जणांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून ४५ मोबाईल फोन, पाच लॅपटॉप आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिसांनी गोठवलेल्या आरोपींच्या ६ बँक खात्यांमध्ये १० लाख रुपये सापडले आहेत. हा सट्टा खेळ दुबईतून चालवला जात होता. (IPL betting)
सुशांत गोल्फ सिटी परिसरात असलेल्या एसबीआय एन्क्लेव्ह नावाच्या अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये आयपीएल सामन्यावर ऑनलाइन सट्टेबाजी (IPL betting) सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने छापा टाकून तेथून १२ जणांना अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून ४५ मोबाईल फोन, ५ लॅपटॉप, २ टॅबलेट, ६ चेकबुक, दोन पासबुक, १४ आधार कार्ड, दोन पॅन कार्ड, २१ डेबिट आणि एक क्रेडिट कार्ड जप्त केल्याचे डीसीपी दक्षिण तेज स्वरूप सिंह यांनी सांगितले. (IPL betting)
टेलिग्राम ॲपद्वारे चालवत होते सट्टा
एडीसीपी दक्षिण शशांक सिंह यांनी सांगितले की, सट्टेबाजीचा खेळ (IPL betting) दुबईतून चालवला जात होता. अटक करण्यात आलेले सट्टेबाज टेलिग्राम ॲपद्वारे लोकांशी संपर्क साधत. यानंतर ते व्यवहारासाठी क्यूआर कोड पाठवत. क्यूआर कोडद्वारे पैसे पाठवल्यानंतर सट्टेबाज त्यांचे पैसे आयपीएलमध्ये गुंतवत. पैसे गुंतवणाऱ्या व्यक्तीला ऑनलाइन पॉइंट मिळत होते, जे तो कधीही कॅश करू शकत होता. सट्टेबाजांचे जाळे बंगळुरू, चंदीगड आणि कोलकाता येथे पसरल्याचे चौकशीत समोर आले आहे. आतापर्यंत केलेल्या तपासात संशयीत आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पोलिसांना १० लाख रुपये मिळाले आहेत. (IPL betting)
हेही वाचा :
धक्कादायक…’आयएस’ संबंध प्रकरणी IIT गुवाहाटीच्या विद्यार्थ्याला अटक
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून अशोक नेते यांना महायुतीची उमेदवारी
माजी खासदार नवीन जिंदाल यांचा काँग्रेसला राम राम; पक्षाच्या प्राथमिक…
Latest Marathi News IPL सामन्यांवर दुबईतून ऑनलाइन सट्टेबाजी; युपीतून १२ जणांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.