काळजी घ्या! महाराष्ट्र तापतोय; ‘या’ भागात अधिक तापमान

सलग दुसर्‍या दिवशीही मालेगावचा पारा 40 अंश पुणे : राज्यात कोरड्या हवामानामुळे तापमानात वाढ होत असून, सलग दुसर्‍या दिवशी मालेगावात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश शहरांच्या तापमानात वाढ होत आहे. विदर्भात झालेली गारपीट आणि पावसामुळे कमाल तापमानाचा पारा खाली घसरला होता. आता मात्र पुन्हा तापमानात वाढ … The post काळजी घ्या! महाराष्ट्र तापतोय; ‘या’ भागात अधिक तापमान appeared first on पुढारी.
काळजी घ्या! महाराष्ट्र तापतोय; ‘या’ भागात अधिक तापमान

सलग दुसर्‍या दिवशीही मालेगावचा पारा 40 अंश
पुणे : राज्यात कोरड्या हवामानामुळे तापमानात वाढ होत असून, सलग दुसर्‍या दिवशी मालेगावात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश शहरांच्या तापमानात वाढ होत आहे.
विदर्भात झालेली गारपीट आणि पावसामुळे कमाल तापमानाचा पारा खाली घसरला होता. आता मात्र पुन्हा तापमानात वाढ होऊ लागली आहे. कोरड्या हवामानामुळे कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
तामिळनाडूपासून ते विदर्भापर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे. मात्र, त्याचा प्रभाव कमी होत चालला आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होत चालली आहे. दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सध्या कोरडे हवामान आहे. त्यातच दक्षिण भारताकडून राज्याकडे उष्ण वारे वाहत आहेत. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. अगदी सकाळपासूनच उकाडा वाढत असून, कडक उन्हामुळे नागरिक घामाघूम होऊ लागले आहेत.
हेही वाचा

पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन होणार : राजनाथ सिंह
Foot Health : पादत्राणांची निवड आणि पायांचे आरोग्य
सोलापूर : टेंभुर्णी शहरात दिवसा-ढवळ्या भाजीविक्रेत्या तरुणावर जीवघेणा हल्ला

Latest Marathi News काळजी घ्या! महाराष्ट्र तापतोय; ‘या’ भागात अधिक तापमान Brought to You By : Bharat Live News Media.