सुरगाणा, Bharat Live News Media वृत्तसेवा : येथील आदिवासी भागात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नोकरीसह व्यवसायासाठी बाहेरगावी गेलेले चाकरमानी होळीनिमित्त आवर्जून गावी येतात. या गावात होळीला यात्रेनिमित्त ‘फाग’ मागण्याची प्रथा आजही साजरी केली जाते.
सुरगाणा येथे होळीनिमित्त दुर्गा देवीची मोठी यात्रा भरली जाते. या यात्रेत बाहेरगावावरून अनेक व्यवसायिक व व्यापारी हजेरी लावतात. त्यामुळे यात्रेत मोठी आर्थिक उलाढाल होते. यात्रेत लोककला व लोकसंस्कृतीचे दर्शन घडते. गावात होळीनिमित्त भरवण्यात येणाऱ्या यात्रेत ‘फाग’ मागण्याची प्राचीन परंपरा अजूनही जपली जाते. यात्रेत कलाकार मुकवटे लावून आपली कला सादर करतात. व त्यानंतर पाच ते दहा रूपये ‘फाग’ म्हणून मागतात. लहान मुलांना आकर्षित करणारे पाळणे, फिरत्या गाड्या, शोभेच्या वस्तू , खेळण्यांचे स्टॉल यामुळे यात्रेत मंदिर परिसर फुलून जातो.
हेही वाचा :
Nashik | काय करावं बरं! चाराटंचाई, पाणीटंचाई आणि आता तर धरणसाठाही घटलाय
नाशिक : पाण्यासाठी दाही दिशा; वाड्या-वस्त्यांवरील महिलांची पाण्यासाठी होतेय वणवण
Nashik | सावध व्हा! लहान बालकांमध्ये बळावतो मायोपिया
Latest Marathi News नाशिक : सुरगाणा येथे होळीला आजही आहे ‘फाग’ मागण्याची प्रथा Brought to You By : Bharat Live News Media.