GT vs MI : गुजरातला दुसरा धक्का; शुभमन गिल तंबूत

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 हंगामातील पाचवा सामना आज (दि.२४) गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ९ षटकांमध्ये गुजरातने दोन गडी गमावत ६९ धावा केल्या आहेत. गुजरातला दुसरा धक्‍का आठव्‍या षटकात पियुष चावल्‍याने शुभमन … The post GT vs MI : गुजरातला दुसरा धक्का; शुभमन गिल तंबूत appeared first on पुढारी.

GT vs MI : गुजरातला दुसरा धक्का; शुभमन गिल तंबूत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : IPL 2024 हंगामातील पाचवा सामना आज (दि.२४) गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ९ षटकांमध्ये गुजरातने दोन गडी गमावत ६९ धावा केल्या आहेत.
गुजरातला दुसरा धक्‍का
आठव्‍या षटकात पियुष चावल्‍याने शुभमन गिलला रोहित शर्मा करवी झेलबाद केले. शुभमनने २२ चेंडूत ३ चौकार व १ षटकार पटकावत ३१ धावा केल्‍या.
गुजरातचे सलामीवीर शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा यांनी संघाला चांगील सुरुवात करुन दिली. मात्र चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने साहा क्लीन बोल्ड केले. त्‍याने १९ धावा केल्‍या. पाच षटकांनंतर गुजरातने १ गडी गमावत ४७ धावा केल्‍या.
आजच्‍या सामन्यात मुंबई तीन परदेशी खेळाडू टीम डेव्हिड, गेराल्ड कोएत्झी आणि डावखुरा वेगवान गोलंदाज ल्यूक वुड यांच्यासोबत खेळताना दिसणार आहे . तर डेव्हिड मिलर, स्पेन्सर जॉन्सन आणि अजमतुल्ला ओमरझाई हे गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसणार आहेत.

Latest Marathi News GT vs MI : गुजरातला दुसरा धक्का; शुभमन गिल तंबूत Brought to You By : Bharat Live News Media.