लडाख भारताच्या शौर्य आणि पराक्रमाची राजधानी : राजनाथ सिंह

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लडाख हा भारत मातेचा चमकणारा मुकुट आहे. हे राष्ट्रीय संकल्पाचे प्रतिनिधित्व करते. देशाची राजकीय राजधानी दिल्ली आहे. आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि तांत्रिक राजधानी बेंगळुरू आहे, त्याचप्रमाणे लडाख ही शौर्य आणि पराक्रमाची राजधानी आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
लेहमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (दि.२४) सशस्त्र दलाच्या जवानांसोबत होळी साजरी केली. राजनाथ सिंह यांच्यासोबत लष्करप्रमुख मनोज पांडेही उपस्थित होते. राजनाथ सिंह यांनी लेह येथील ‘हॉल ऑफ फेम’ येथे देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली. त्यांनंतर त्यांनी सैनिकांसोबत होळी साजरी केली. राजनाथ सिंह जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन येथे सैनिकांसोबत होळी साजरी करणार होते. मात्र हवामानातील बदलामुळे त्यांना सियाचीन दौरा बदलावा लागला.
यावेळी सैनिकांना संबोधित करताना मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, सैनिकांसोबत सण साजरे करणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. कारगिलच्या बर्फाच्छादित शिखरांवर, राजस्थानच्या धुमसत असलेल्या वालुकामय मैदानात, खोल समुद्रात असलेल्या पाणबुड्यांमध्ये, या ठिकाणी सर्वप्रथम, प्रत्येक वेळी सण साजरे केले पाहिजेत, असे ते म्हणाले.
“दिवाळीचा पहिला दिवा, होळीचा पहिला रंग, हे सर्व आपल्या रक्षकांच्या नावाने असावे, आपल्या सैनिकांसोबत असावे. सण आधी सियाचीन आणि कारगिलच्या शिखरांवर साजरे केले पाहिजेत. या दऱ्याखोऱ्यांत जेव्हा थंडगार वारे वाहतात, तेव्हा प्रत्येकाला आपापल्या घरात राहावेसे वाटते, अशा परिस्थितीतही तुम्ही हवामानाला तोंड देत उभे राहता. या अतूट इच्छाशक्तीच्या प्रदर्शनासाठी देश सदैव तुमचा ऋणी राहील. येणाऱ्या काळात, जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तुमच्या शौर्याचे कृत्य अभिमानाने स्मरणात राहील. शत्रूंपासून आमचे रक्षण करणारे तुम्ही सर्व सैनिक आमच्यासाठी देवांपेक्षा कमी नाहीत, तुमच्यामुळेच देशातील लोक शांततेने होळी साजरी करू शकतात, असे राजनाथ सिंह म्हणाले.
हेही वाचा :
माजी हवाई दल प्रमुख भदौरिया भाजपमध्ये दाखल
कंगाल पाकिस्तानची मदतीसाठी भारताकडे ‘नजर’ : परराष्ट्र मंत्री दार म्हणाले…
केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीत ‘इंडिया’ आघाडी घेणार महासभा
The post लडाख भारताच्या शौर्य आणि पराक्रमाची राजधानी : राजनाथ सिंह appeared first on Bharat Live News Media.
