दाऊद इब्राहिमच्या पैठण एमआयडीसी परिसरातील मालमत्तेचा होणार लिलाव

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण एमआयडीसी परिसरामध्ये कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम मालकीची मालमत्ता जमीन जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याच्या हालचाली आयकर विभागाने सुरू केल्या आहेत. यासंदर्भात मंगळवारी (दि. २१) मुंबई येथील आयकर विभागाचे सक्षम प्राधिकारी व प्रशासकीय अधिकारी सौरभ शर्मा यांनी मिळकत लिलाव करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या एक महिन्यापासून पैठण तालुक्यातील एमआयडीसी अमली … The post दाऊद इब्राहिमच्या पैठण एमआयडीसी परिसरातील मालमत्तेचा होणार लिलाव appeared first on पुढारी.
#image_title

दाऊद इब्राहिमच्या पैठण एमआयडीसी परिसरातील मालमत्तेचा होणार लिलाव

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण एमआयडीसी परिसरामध्ये कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम मालकीची मालमत्ता जमीन जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याच्या हालचाली आयकर विभागाने सुरू केल्या आहेत. यासंदर्भात मंगळवारी (दि. २१) मुंबई येथील आयकर विभागाचे सक्षम प्राधिकारी व प्रशासकीय अधिकारी सौरभ शर्मा यांनी मिळकत लिलाव करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
गेल्या एक महिन्यापासून पैठण तालुक्यातील एमआयडीसी अमली पदार्थ प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी पैठण येथील एमआयडीसी परिसरात दाऊद इब्राहिमने सहाशे चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली जमीन एमआयडीसी विभागाकडून खरेदी केली होती. या जमिनीची देखभाल नाशिक येथील संपत सांगळे हा व्यक्ती बघत होता. परंतु दाऊद इब्राहिम याला अटक झाल्यानंतर दाऊद इब्राहिमची राज्यात असलेली मालमत्ता जप्त करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये पैठण येथील एमआयडीसी परिसरातील कंपनीसाठी गट क्रमांक ए.-४९ सहाशे चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली जागांवर थेट डॉन दाऊद इब्राहिम यांचा संबंध असल्याचे उघड झाल्यामुळे ही जमीन जप्त करण्यात आली होती. त्यानुसार संपत्ती जप्त १९७६ अधिनियम १९८८ प्रतिबंधक कायद्यानुसार ही संपत्ती दि.५ जानेवारीपर्यंत लिलाव करण्याची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. यासाठी मुंबई येथील आयकर विभागाच्या विशेष अधिकारी यांच्या पथकाने पैठण एमआयडीसी येथे भेट देऊन जमीन लीलावची प्रक्रिया सुरू केली आहे. या जमिनीची बयाणा रक्कम ६३ हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे.
The post दाऊद इब्राहिमच्या पैठण एमआयडीसी परिसरातील मालमत्तेचा होणार लिलाव appeared first on पुढारी.

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण एमआयडीसी परिसरामध्ये कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम मालकीची मालमत्ता जमीन जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याच्या हालचाली आयकर विभागाने सुरू केल्या आहेत. यासंदर्भात मंगळवारी (दि. २१) मुंबई येथील आयकर विभागाचे सक्षम प्राधिकारी व प्रशासकीय अधिकारी सौरभ शर्मा यांनी मिळकत लिलाव करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या एक महिन्यापासून पैठण तालुक्यातील एमआयडीसी अमली …

The post दाऊद इब्राहिमच्या पैठण एमआयडीसी परिसरातील मालमत्तेचा होणार लिलाव appeared first on पुढारी.

Go to Source