बारामती : हल्ला झालेल्या ‘त्या’ युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

बारामती : पुढारी वृत्तसेवा चायनीज हॉटेलात पार्सल आणण्यासाठी गेलेल्या युवकावर जुन्या भांडणाच्या कारणावरून लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अनिकेत शंकर धोत्रे या युवकाचा आज रविवारी (दि. २४) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमोल उर्फ भोऱ्या धोंडीराम पवार, हनुमंत दिलीप धोत्रे, नवनाथ महादेव धोत्रे (रा. कोअर हाऊस, आमराई, बारामती), विनोद … The post बारामती : हल्ला झालेल्या ‘त्या’ युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू appeared first on पुढारी.
बारामती : हल्ला झालेल्या ‘त्या’ युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा चायनीज हॉटेलात पार्सल आणण्यासाठी गेलेल्या युवकावर जुन्या भांडणाच्या कारणावरून लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अनिकेत शंकर धोत्रे या युवकाचा आज रविवारी (दि. २४) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अमोल उर्फ भोऱ्या धोंडीराम पवार, हनुमंत दिलीप धोत्रे, नवनाथ महादेव धोत्रे (रा. कोअर हाऊस, आमराई, बारामती), विनोद रोहिदास धोत्रे, सुमित उर्फ भैय्या विलास धोत्रे (रा. रमाईमाता भवन, आमराई) व सागर पवार (रा. मुंबई) यांच्यावर अनिकेतवर हल्ला केल्याप्रकरणी यापूर्वीच शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आता खूनाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, दि. १७ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. अनिकेत व त्याचा मित्र रितेश मोहन देवकर (रा. चंद्रमणीनगर, बारामती) हे दोघे चायनीज आणण्यासाठी बालक मंदिराच्या पाठीमागील श्री. चायनीज हॉटेलात गेले होते. यावेळी पाच ते सहा अनोळखी युवकांनी तेथे येत अनिकेतला मारहाण केली. हॉटेलातील सीसीटीव्ही फूटेज पाहिले असता त्यात हे युवक लाकडी दांडके, लोखंडी रॉडने अनिकेतला मारहाण करताना दिसून आले आहेत. मारहाणीमुळे अनिकेत हा बाहेर पळाला असता त्यांनी त्याला गाठत पुन्हा मारहाण केली. रितेश हा भांडणे सोडवताना दिसून आला. बेशुद्धावस्थेतील अनिकेतला बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु गंभीर मारहाण झालेल्या अनिकेतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हेही वाचा :

Mobile Blast : चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट, ४ चिमुकल्यांचा मृत्यू
Lok Sabha Election 2024 : माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया भाजपमध्ये दाखल
Lok Sabha Election: मी अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

Latest Marathi News बारामती : हल्ला झालेल्या ‘त्या’ युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.