काँग्रेस सत्तेत आल्यास जातीनिहाय जनगणना करणाार : मल्लिकार्जुन खरगे
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षण वादामुळे आता राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकारणात जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा तापला आहे. अशातच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आमचा पक्ष (काँग्रेस) सत्तेत आला तर आम्ही जातीनिहाय जनगणना करू, अशी घोषणा केली आहे. नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांना ही घोषणा केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपूरमध्ये आले होते. जातीनिहाय जनगणना हा देशातला सर्वात मोठा मुद्दा आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यास देशातला निधी कोणत्या आधारावर वितरित केला जातोय, तेदेखील या माध्यमातून सर्वांच्या समोर येईल अशी राहुल गांधी यांची भूमिका आहे. आमची देखील हीच भूमिका आहे असे यावेळी खरगे यांनी सांगितले. दरम्यान, भाजप नेते काँग्रेसवर तुष्टीकरणाचे आरोप करीत आहेत. पण, तुष्टीकरणाचे राजकारण भाजपच करीत आहे. काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याने भारत जाेडो यात्रा करीत असल्याचे खरगे यांनी आवर्जून सांगितले. निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे याकडे लक्ष वेधले असता नोटीस मिळाल्यानंतर ठरवू असेही खर्गे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
15 लाख रु., 20 कोटी नोकर्यांचे काय : मल्लिकार्जुन खर्गे
Parliament Special Session : नव्या संसदेत पहिल्याच दिवशी सीतारामन-खर्गे चकमक
G20 Dinner : G20 डिनरचे आमंत्रण न मिळाल्याबाबत खर्गे म्हणाले, राजकारण…
The post काँग्रेस सत्तेत आल्यास जातीनिहाय जनगणना करणाार : मल्लिकार्जुन खरगे appeared first on पुढारी.
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षण वादामुळे आता राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकारणात जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा तापला आहे. अशातच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आमचा पक्ष (काँग्रेस) सत्तेत आला तर आम्ही जातीनिहाय जनगणना करू, अशी घोषणा केली आहे. नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांना ही घोषणा केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे एका खासगी कार्यक्रमात सहभागी …
The post काँग्रेस सत्तेत आल्यास जातीनिहाय जनगणना करणाार : मल्लिकार्जुन खरगे appeared first on पुढारी.