मराठा समाजाची आरक्षणप्रश्नी २४ मार्च रोजी महानिर्णायक बैठक

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीत उद्या २४ मार्च रोजी मराठा समाजाची महानिर्णयाक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणा संदर्भात आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार आहेत. या बैठकीला राज्यभरातून मराठा समाज मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने या दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जालना पोलिसांच्या वतीने … The post मराठा समाजाची आरक्षणप्रश्नी २४ मार्च रोजी महानिर्णायक बैठक appeared first on पुढारी.

मराठा समाजाची आरक्षणप्रश्नी २४ मार्च रोजी महानिर्णायक बैठक

वडीगोद्री, Bharat Live News Media वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीत उद्या २४ मार्च रोजी मराठा समाजाची महानिर्णयाक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणा संदर्भात आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार आहेत. या बैठकीला राज्यभरातून मराठा समाज मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने या दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जालना पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त रवाना तैनात करण्यात आला आहे.
उद्या होणाऱ्या बैठकीसाठी राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, कुआर्टी च्या जवानांसह अंतरवाली सराटीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात येणार असून यासाठी २८ पोलीस अधिकारी, १८० पोलीस कर्मचारी, ५० गृह रक्षक दलाचे कर्मचारी व राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या म्हणजे २०० कर्मचारी असणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बैठकी दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक १, पोलीस उपविभागीय अधिकारी १, पोलीस निरिक्षक ४, सहाय्यक पोलिस निरिक्षक व पोलीस उपनिरीक्षक २३ असे एकूण २९ अधिकारी, १८० पोलीस कर्मचारी, ५० गृह रक्षक दलाचे कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या असा पोलीस बंदोबस्तकामी तैनात करण्यात येणार आहेत.
Latest Marathi News मराठा समाजाची आरक्षणप्रश्नी २४ मार्च रोजी महानिर्णायक बैठक Brought to You By : Bharat Live News Media.