“भूतानचे राजे विमानतळावर सोडण्यासाठी आले…” : PM मोदींनी व्‍यक्‍त केली कृतज्ञता

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतानचा दौरा करून दिल्लीत परतले आहेत. त्यांनी भूतान भेटीशी संबंधित अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी विमानतळावर सोडल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्‍यक्‍त केली आहे. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि पंतप्रधान शेरिंग तोबगे हे पंतप्रधान मोदींना विमानतळावर सोडण्यासाठी … The post “भूतानचे राजे विमानतळावर सोडण्यासाठी आले…” : PM मोदींनी व्‍यक्‍त केली कृतज्ञता appeared first on पुढारी.
“भूतानचे राजे विमानतळावर सोडण्यासाठी आले…” : PM मोदींनी व्‍यक्‍त केली कृतज्ञता


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतानचा दौरा करून दिल्लीत परतले आहेत. त्यांनी भूतान भेटीशी संबंधित अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी विमानतळावर सोडल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्‍यक्‍त केली आहे.
भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि पंतप्रधान शेरिंग तोबगे हे पंतप्रधान मोदींना विमानतळावर सोडण्यासाठी आले होते. यावर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कृतज्ञता व्‍यक्‍त केली आहे.
‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो’ने सन्मानित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, ‘भूतानची ही भेट खूप खास होती. मला भूतानचे राजा, पंतप्रधान तोबगे आणि जनतेला भेटण्याची संधी मिळाली. आमच्या चर्चेमुळे भारत-भूतान मैत्री आणखी घट्ट होईल. ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पोने सन्मानित केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. भूतानच्या लोकांच्या प्रेमळपणाबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. भूतानसाठी भारत नेहमीच विश्वासार्ह मित्र आणि भागीदार राहील.
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी थिम्पूमध्ये ग्याल्ट्सुएन जेटसन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटलचे उद्‍घाटन केले. भारत सरकारच्या मदतीने हे रुग्णालय बांधण्यात आले आहे. उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले होते की, ‘ग्यालत्सुएन जेटसन पेमा वांगचुक यांनी मदर अँड चाइल्ड हॉस्पिटलचे उद्घाटन केले, जे अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण आहे. हे रुग्णालय निरोगी भावी पिढीचे पालनपोषण करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.’

I am honoured by the special gesture by His Majesty the King of Bhutan, Jigme Khesar Namgyel Wangchuck of coming to the airport as I leave for Delhi.
This has been a very special Bhutan visit. I had the opportunity to meet His Majesty the King, PM
 
The post “भूतानचे राजे विमानतळावर सोडण्यासाठी आले…” : PM मोदींनी व्‍यक्‍त केली कृतज्ञता appeared first on Bharat Live News Media.

Go to Source