होळीनिमित्त ‘मावेल जेव्हढे पोटात, तेव्हढेच घ्यावे ताटात’, राणी लक्ष्मीबाई बचत गटाचा स्तुत्य उपक्रम

इंदिरानगर : प्रतिनिधी होळीसण प्रदूषण मुक्त करण्यासाठी पालापाचोळयाची होळी करा. होळी सणाच्या निमित्ताने धूलिवंदन, रंगपंचमीला रंग खेळताना नैसर्गिक रंग वापरा. पाणी टंचाईत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मोकळ्या बगिच्यात रंग खेळावा म्हणजे बागेतील झाडांना पाणी मिळेल. होळी पारंपरिक सणाच्या निमित्ताने होळीला दाखवला जाणारा पुराणपोळीचा नेवैद्य हा होळीत न टाकता तो संकलित करून परिसरातील गरीबांना दान करा असे … The post होळीनिमित्त ‘मावेल जेव्हढे पोटात, तेव्हढेच घ्यावे ताटात’, राणी लक्ष्मीबाई बचत गटाचा स्तुत्य उपक्रम appeared first on पुढारी.
होळीनिमित्त ‘मावेल जेव्हढे पोटात, तेव्हढेच घ्यावे ताटात’, राणी लक्ष्मीबाई बचत गटाचा स्तुत्य उपक्रम

इंदिरानगर : प्रतिनिधी होळीसण प्रदूषण मुक्त करण्यासाठी पालापाचोळयाची होळी करा. होळी सणाच्या निमित्ताने धूलिवंदन, रंगपंचमीला रंग खेळताना नैसर्गिक रंग वापरा. पाणी टंचाईत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मोकळ्या बगिच्यात रंग खेळावा म्हणजे बागेतील झाडांना पाणी मिळेल. होळी पारंपरिक सणाच्या निमित्ताने होळीला दाखवला जाणारा पुराणपोळीचा नेवैद्य हा होळीत न टाकता तो संकलित करून परिसरातील गरीबांना दान करा असे आवाहन “मावेल जेव्हढे पोटात, तेव्हढेच घ्यावे ताटात” या संकल्पनेनुसार राणेनगर, चेतनानगर येथील राणी लक्ष्मीबाई बचत गटाच्या वतीने वैशाली बंडू दळवी यांनी केले आहे.
होळीत पुरण पोळी टाकून अन्न वाया जाऊ नये या साठी “जेव्हढे पोटात, तेव्हढेच घ्यावे ताटात”या उपक्रमात सहभागी होऊन पोळीचा नेवैद्य हा एक घास होळीत टाका आणि उर्वरित पुरण पोळीचा नेवैद्य गरिबांना वाटण्यासाठी संकलित करा आणि सणाचा आनंद वाटून घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.  या साठी वडाळा पाथर्डी रोड, गजानन महाराज मंदिराचे समोर व राणेंनगर प्रवेशद्वार येथील सामाजिक कार्यकर्ते वैशाली बंडू दळवी याचे संपर्क कार्यालयात संकलन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Latest Marathi News होळीनिमित्त ‘मावेल जेव्हढे पोटात, तेव्हढेच घ्यावे ताटात’, राणी लक्ष्मीबाई बचत गटाचा स्तुत्य उपक्रम Brought to You By : Bharat Live News Media.