नागपूर : पटोले, वडेट्टीवार निवडणुकीला घाबरले : आशिष देशमुख

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे दोघेही लोकसभा निवडणुकीला घाबरलेत असा आरोप भाजपचे माजी आमदार डॉ आशीष देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, वडेट्टीवार यांनी 2019 ला तिकीट मागण्यासाठी कोण काँग्रेसकडे आले होते असा चिमटा प्रत्युत्तरादाखल काढला आहे. आशीष देशमुख म्हणाले, भाजप विकसित देश होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, … The post नागपूर : पटोले, वडेट्टीवार निवडणुकीला घाबरले : आशिष देशमुख appeared first on पुढारी.

नागपूर : पटोले, वडेट्टीवार निवडणुकीला घाबरले : आशिष देशमुख

नागपूर ; Bharat Live News Media वृत्‍तसेवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे दोघेही लोकसभा निवडणुकीला घाबरलेत असा आरोप भाजपचे माजी आमदार डॉ आशीष देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, वडेट्टीवार यांनी 2019 ला तिकीट मागण्यासाठी कोण काँग्रेसकडे आले होते असा चिमटा प्रत्युत्तरादाखल काढला आहे.
आशीष देशमुख म्हणाले, भाजप विकसित देश होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, काँग्रेचे नेते पराभूत मानसिकतेत आहेत. गेल्यावेळी नागपूर लोकसभा लढलेले नाना पटोले हे पळून गेले आहेत, स्वतःच्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात निवडणूक लढण्यास ते घाबरतात. हीच परिस्थिती वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांचीही आहे. संजय राऊत यांच्या आरोपांविषयी बोलताना त्‍यांचे बोलणे हे अतिशयोक्‍ती असते. त्याचे परिणाम त्‍यांना लवकरच दिसतील. महायुतीत जागा वाटप का रखडले या संदर्भात बोलताना आगे देखीये होता है क्या, आता सुट्टी असल्याने दोन दिवसात उमेदवार जाहीर होतील असे त्‍यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : 

राजगुरूंच्या भूमीत फ्लेक्स सांगु लागले देशभक्तीचा इतिहास..

रोहित पवार, युगेंद्र पवार यांना सुरक्षा द्या : खा. सुप्रिया सुळे

Lok Sabha elections 2024 : महिला मतदानाच्या बाबतीत देशाचे क्रांतिकारी पाऊल!

Latest Marathi News नागपूर : पटोले, वडेट्टीवार निवडणुकीला घाबरले : आशिष देशमुख Brought to You By : Bharat Live News Media.