जोगेश्वरीचा पती भैरवनाथसह ‘या’ मालिकेतील कलाकारांचे होळीचे अनुभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : कौटुंबिक परंपरेपासून ते होळीच्या सारावरच्या प्रतिबिंबापर्यंत, ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ आणि ‘जोगेश्वरीचा पती भैरवनाथ’ या प्रतिभावान मालिकेतील कलाकारांनी होळी या सणाच्या आनंदाच्या प्रसंगी त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचे विचार मांडले. मानसीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या (Holi Special ) ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमधील तन्वी किरणने तिच्या भावना व्यक्त केल्या. “आमच्या सुरू … The post जोगेश्वरीचा पती भैरवनाथसह ‘या’ मालिकेतील कलाकारांचे होळीचे अनुभव appeared first on पुढारी.
जोगेश्वरीचा पती भैरवनाथसह ‘या’ मालिकेतील कलाकारांचे होळीचे अनुभव

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कौटुंबिक परंपरेपासून ते होळीच्या सारावरच्या प्रतिबिंबापर्यंत, ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ आणि ‘जोगेश्वरीचा पती भैरवनाथ’ या प्रतिभावान मालिकेतील कलाकारांनी होळी या सणाच्या आनंदाच्या प्रसंगी त्यांच्या वैयक्तिक अनुभवांचे विचार मांडले.
मानसीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या (Holi Special ) ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमधील तन्वी किरणने तिच्या भावना व्यक्त केल्या. “आमच्या सुरू असलेल्या शूटिंगच्या वचनबद्धतेमुळे, मी होळीच्या सणामध्ये सहभागी होऊ शकेन की नाही याबद्दल मी अनिश्चित आहे. पण, जर मला माझ्या कुटुंबासोबत होळी साजरी करता नाही आली तरी आम्ही आमच्या सेटवर एक उत्सव आयोजित करू शकतो. वैयक्तिरित्या, मला होळीचा आनंद घेणे आव्हानात्मक वाटते कारण बरीच लोकं सिंथेटिक रंगाचा वापर करतात आणि दुर्दैवाने, मला पूर्वी एक कटू अनुभव आलेला आहे, जसे की एकदा एका अनोळखी व्यतकीने मला होळीच्या शुभेच्छा देताना माझ्या डोक्यावर एक अंडे फोडले. (Holi Special )
अशा घटनांमुळे मला होळीच्या सणा मध्ये सहभाग करताना संकोच होतो. तरीसुद्धा, मी माझ्या कुटुंबासोबत होळी खेळणे पसंत करते, जिथे आम्ही काटेकोरपणे ऑरगॅनिक रंगांचा वापर करतो.”
‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ मालिकेमध्ये प्रतापची भूमिका साकारणार प्रदीप घुले म्हणतो, “प्रत्येक वर्षाप्रमाणे, मी माझ्या प्रियजनांसोबत होळी साजरी करण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. पुरणपोळी खाऊन सुरुवात करण्याची आमची परंपरा आहे, त्यानंतर होळी सारखा उत्साहाचा सण साजरा केला जातो. होळीच्याच दिवशी संध्याकाळी आणि नंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमीमध्ये आम्ही सगळेजण मग्न असतो. होळीमध्ये रंगपंचमी खेळताना मला खूप आनंद मिळतो. बालपणीच्या होळीच्या आठवणी खूप मौल्यवान आहेत, आणि आता कामामुळे अनेकदा त्या दिवसांप्रमाणे होळी चा सण साजरा करता येत नाही. तरीही मला त्या दिवसांतील त्या उत्सवातील साधेपणाची खूप आठवण येते.”

‘जोगेश्वरीचा पती भैरवनाथ’ मालिकेमधील प्रतीक निकमने होळीच्या सणा विषयी त्याच्या योजना सांगितल्या. “दरवर्षी प्रमाणे, आमची सोसायटी विविध कार्यक्रम आणि सादरीकरणांसह एक उत्साही उत्सव आयोजित करते. यावेळी, मी काहीतरी खास नियोजन केले आहे. माझी आई जी सामान्यत: सर्व तयारी हाताळते त्या सर्व जबाबदाऱ्या मी घेणार आहे, आईला योग्य विश्रांती मिळावी म्हणून मी होळी निम्मिताचे स्वादिष्ट पदार्थ स्वतः बनवणार आहे. हे तिच्यासाठी एक आश्चर्यच असेल. होळीबद्दल बोलताना मला माझे शाळेचे दिवस आठवतात, शाळेत असताना, मी खूप खोडकर होतो. विशेषत: होळीच्या वेळी जेव्हा आम्ही आमचे चेहरे रंगांनी झाकायचो तर एकदा खोडकरपणामुळे आम्ही एका दुकानदाराचा बदला घेण्याचा प्रयत्न केला जो आम्हाला अनेकदा शिवीगाळ करायचा. आमचे चेहरे रंगांनी लपवून आम्ही त्याला पकडले आणि रंगात रंगवले.”
‘जोगेश्वरीचा पती भैरवनाथ मध्ये’ जोगेश्वरीची भूमिका साकारणारी ऐश्वर्या माने म्हणते, “दरवर्षी, मी स्थानिक कार्यक्रमात होळी साजरी करण्यासाठी उत्सुक असते, संगीत, नृत्य आणि आनंदी लोक आसपास असतात. एक कृष्ण भक्त म्हणून, मी होळीचे रंग राधा आणि कृष्ण यांच्यातील शाश्वत प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहते. प्रेमासाठी लाल, हळदीसाठी पिवळा, कृष्णासाठी निळा आणि नवीन सुरुवातीसाठी हिरवा. मी आणि माझे कुटुंब नेहमी देवळात, आकर्षक रंगांनी कपडे घालून, पाण्याचे फुगे आणि पावडर पेंटने खेळण्यासाठी जमतो. हा दिवस पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थांनी भरलेला आहे आणि माझ्या मनाला प्रिय असलेल्या आठवणींनी भरलेला आहे.”
जसजशी होळी जवळ येते, तसतसे या प्रतिभावान कलाकारांचे प्रतिबिंब सणाचे भावविश्व समृद्ध करतात. विविध अनुभव आणि परंपरांची आठवण करून देतात. ज्यामुळे हा उत्सव खरोखरच खास होतो. त्यांचे शब्द गुंजतात, त्यांच्या जीवनातील होळीचे महत्त्व सखोलपणे समजून घेता येतात.
सौ प्रताप मानसी सुपेकर आणि जोगेश्वरीचा पती भैरवनाथ’ फक्त शेमारू मराठीबाणावर पाहता येईल.
Latest Marathi News जोगेश्वरीचा पती भैरवनाथसह ‘या’ मालिकेतील कलाकारांचे होळीचे अनुभव Brought to You By : Bharat Live News Media.