हान की बडीव! मेस्सीच्या मॅचमध्ये ब्राझील पोलिसांनी अर्जेंटीनाच्या चाहत्यांना धुतले(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : Argentina Brazil Fans Clash : रिओ दि जानेरो येथील माराकाना स्टेडियमवर ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यातील फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यादरम्यान ब्राझीलच्या पोलिसांनी केलेल्या क्रूरतेचे प्रकरण समोर आले आहे. अर्जेंटिनाच्या समर्थकांवर लाठीचार्ज होत असल्याचे पाहून कर्णधार लिनोनेल मेस्सी आणि त्याच्या संघातील सदस्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्यांनी जीवाची पर्वा न … The post हान की बडीव! मेस्सीच्या मॅचमध्ये ब्राझील पोलिसांनी अर्जेंटीनाच्या चाहत्यांना धुतले(Video) appeared first on पुढारी.
#image_title

हान की बडीव! मेस्सीच्या मॅचमध्ये ब्राझील पोलिसांनी अर्जेंटीनाच्या चाहत्यांना धुतले(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : Argentina Brazil Fans Clash : रिओ दि जानेरो येथील माराकाना स्टेडियमवर ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यातील फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यादरम्यान ब्राझीलच्या पोलिसांनी केलेल्या क्रूरतेचे प्रकरण समोर आले आहे. अर्जेंटिनाच्या समर्थकांवर लाठीचार्ज होत असल्याचे पाहून कर्णधार लिनोनेल मेस्सी आणि त्याच्या संघातील सदस्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्यांनी जीवाची पर्वा न करता आपल्या देशवासीयांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला.
सामन्यादरम्यान, ब्राझीलचे पोलीस आणि अर्जेंटिनाच्या समर्थकांमध्ये अचानक चकमक उडाली. यानंतर ब्राझील पोलिसांनी अर्जेंटिनाच्या समर्थकांवर लाठीचार्ज केला. दिसेल त्याला पोलिस काठीने चोप देत होते. या मारहाणीत अनेक प्रेक्षक जबर जखमी झाले. काही चाहते तर रक्तबंबाळ झाले. हे विदारक दृश्य पाहून अर्जेंटीनाच्या खेळाडूंचे मन हेलावले. आपल्या चाहत्यांना अशी क्रुर मारहाण त्यांना सहन झाली नाही आणि त्यांनी सामन्यातून बाजूला होत समर्थकांना वाचवण्यासाठी स्टँडच्या दिशेने धावले. ते पोलिसांना ओरडून मारहाण थांबवण्याचे आव्हान करत होते. अखेर कसेबसे पोलिस थांबले. अशाप्रकारे चाहत्यांना अर्जेंटीनाच्या खेळाडूंना यश आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Argentina Brazil Fans Clash)

This might be the craziest football scene I have watched in years. Brazil vs Argentina ended violence. Players trying to calm down the fans. Insanitypic.twitter.com/7rbjzSpUVN
— CONTEXTUAL MEME (@Contextual_Meme) November 22, 2023

ब्राझीलच्या चाहत्यांनी उडवली मेस्सीची खिल्ली?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे राष्ट्रगीत गायणाचा कार्यक्रम झाला, तेव्हा भेट देणारे अर्जेंटिनाचे चाहते आणि ब्राझीलच्या प्रेक्षक यांच्यात एका स्टँडमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान काही चाहत्यांनी आक्रमकपणे खुर्च्या फोडल्या. यावेळी ब्राझीलच्या चाहत्यांनी अर्जेंटीनाचा कर्णधार मेस्सीची खिल्ली उडवली. (Argentina Brazil Fans Clash)
जमावाचा पोलिसांवर हल्ला? (Argentina Brazil Fans Clash)
पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असतानाच काही चाहत्यांनी ब्राझीलच्या पोलिसांवर हल्ला केला. चाहत्यांना पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे चिडलेल्या अर्जेंटीच्या मेस्सीने परिस्थिती शांत झाल्यावरच मैदानात परणार असल्याचे स्पष्ट केले आणि तो सहका-यांना घेऊन ड्रेसिंग रूममध्ये गेला. ज्यामुळे 22 मिनिटे हा सामना थांबला.
विश्वचषक पात्रता फेरीत अर्जेंटिना अव्वल स्थानावर
अर्जेंटिना फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धेत (दक्षिण अमेरिका खंड) पाच सामन्यांतून 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ब्राझील पाचव्या स्थानावर आहे. दहा संघांच्या राऊंड-रॉबिन पात्रता स्पर्धेत दोन्ही संघांनी त्यांचे मागील सामने गमावले होते. मात्र, या सामन्यात अर्जेंटिनाने ब्राझीलचा 1-0 असा पराभव केला.
सामन्यानंतर मेस्सी म्हणाला, ‘आम्ही पाहिले की ते ब्राझीलचे पोलिस आमच्या चाहत्यांना कसे मारत आहेत, हे लिबर्टाडोरेसच्या फायनलमध्ये आधीच घडले होते. खेळापेक्षा त्याचे लक्ष त्याकडेच होते. आम्ही लॉकर रूममध्ये गेलो कारण सर्व काही शांत करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग होता.’

Argentina vs Brazil has always been an exciting fixture but not once did I expect to see this 😭pic.twitter.com/Apg3dChthY
— Reasons (@LFCReasons) November 22, 2023

The post हान की बडीव! मेस्सीच्या मॅचमध्ये ब्राझील पोलिसांनी अर्जेंटीनाच्या चाहत्यांना धुतले(Video) appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : Argentina Brazil Fans Clash : रिओ दि जानेरो येथील माराकाना स्टेडियमवर ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यातील फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यादरम्यान ब्राझीलच्या पोलिसांनी केलेल्या क्रूरतेचे प्रकरण समोर आले आहे. अर्जेंटिनाच्या समर्थकांवर लाठीचार्ज होत असल्याचे पाहून कर्णधार लिनोनेल मेस्सी आणि त्याच्या संघातील सदस्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्यांनी जीवाची पर्वा न …

The post हान की बडीव! मेस्सीच्या मॅचमध्ये ब्राझील पोलिसांनी अर्जेंटीनाच्या चाहत्यांना धुतले(Video) appeared first on पुढारी.

Go to Source